MSP Agrowon
ताज्या बातम्या

MSP Conference : ‘स्वाभिमानी’तर्फे‘एमएसपी गॅरंटी’परिषद

स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे रविवारी (ता. १२) दुपारी १२ वाजता परभणी येथे ‘एमएसपी गॅरंटी’ परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिली.

Team Agrowon

MSP Guarantee Conference परभणी ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे (Swabhimani Shetkari Sanghatana) रविवारी (ता. १२) दुपारी १२ वाजता परभणी येथे ‘एमएसपी गॅरंटी’ परिषद आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष किशोर ढगे यांनी दिली.

परभणी येथील वसमत रस्त्यावरील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित ‘एमएसपी गॅरंटी’ परिषदेस स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी, एमएसपी गॅरंटी किसान मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष सरदार व्ही. एम. सिंग, नामांकित विधिज्ञ अॅड. असिम सरोदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

शेतीमालास किमान आधारभूत किंमत (हमीभाव) लागू करूनही त्यास संरक्षण नाही. त्यामुळे शेतकऱ्यांकडून हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केली जाते.

कोणत्याही शेतीमालाची हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी करता येणार नाही. त्यादृष्टीने आवश्यक कायदा केंद्र शासनाने मंजूर करून लागू करावा, या प्रमुख मागणीसाठी ही परिषद आयोजित करण्यात आली आहे, असे ढगे यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT