Water Shortage Aagrowon
ताज्या बातम्या

Tanker Water Supply : पाणी टँकरचे सव्वातीन कोटी अखेर मिळाले

गेल्यावर्षी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना २९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता.

Team Agrowon

Yavatmal News : गेल्यावर्षी जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावांना २९ टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला होता. यासाठी चार कोटी ९२ लाख २४ हजार ३९१ रुपये खर्च झाला. शिल्लक निधीतून काही योजनांचा निधी वितरित करण्यात आला होता. विहिरींचे अधिग्रहण व खासगी टँकरच्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली होती. शासनस्तरावरून निधी वितरणास विलंब झाला.

टँकरचालकांसह अधिग्रहणाकरिता विहिरी देणारे शेतकरी, पाणीपुरवठा विभागात चकरा मारीत होते. वाढत्या मागणीनंतर पाणीपुरवठा विभागाने शासनाकडे पत्रव्यवहार केला. जवळपास वर्षभरानंतर शासनाने सव्वातीन कोटी रुपयांचा निधी पाणीपुरवठा विभागाला दिला. यंदाच्या टंचाईत खासगी विहिरींच्या अधिग्रहणाची कामे प्रस्तावित आहेत.

ही कामे सुरू करण्यापूर्वी निधी आल्याने प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. नवीन कामे करताना जुनी देयके निकाली काढण्यात आली आहे.

गेल्या वर्षी जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला. शंभराहून अधिक महसुली मंडळांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे पाण्याची पातळी वाढली आहे. जलजीवन मिशनच्या माध्यमातून कामे सुरू आहेत.

यंदा उन्हाळ्यात दिलासा

जानेवारी ते जून महिन्यापर्यंत २५६ गावांत २७४ खासगी विहिरींचे अधिग्रहण, विहिरींचे खोलीकरण, गाळ काढणे व १२ गावांत टँकरने पाणीपुरवठा आदी उपाययोजना यंदाच्या टंचाई आराखड्यात सुचविण्यात आलेल्या आहेत.

यासाठी दोन कोटी १५ लाख ८० हजार रुपयांचा टंचाईचा कृतिआराखडा तयार करण्यात आला आहे. एप्रिल महिना सुरू झाला असून, अद्याप एकाही गावात टंचाईच्या अनुषंगाने उपाययोजना करावी लागलेली नाही. म्हणून यंदा उन्हाळ्यात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT