
Nanded News : नांदेडमध्ये सध्या उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे प्रकल्पातील पाणीसाठ्यात (Water Stock) झपाट्याने घट होत आहे. आज घडीला जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघू प्रकल्प, केटीवेअरसह उच्च पातळी बंधाऱ्यात ३१०.४५ दशलक्ष घणमीटरनुसार ४२.६४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
मागील वर्षी यात काळात जिल्ह्यात ५२.०९ टक्के पाणीसाठा होता, अशी माहिती नांदेड पाटबंधारे विभागाकडून (Irrigation Department) देण्यात आली.
जिल्ह्यात मागील वर्षी पावसाळ्यात दरम्यान दमदार पावसामुळे जिल्ह्यातील लहान-मोठ्या संपूर्ण प्रकल्पात शंभर टक्के पाणीसाठा झाला होता. भूगर्भातील पाणीपातळीही वाढली होती. यामुळे यंदा नांदेउ पाटबंधारे विभागाने रब्बी, तसेच उन्हाळी पाणीपाळ्यांचे नियोजन करून सिंचनासाठी पाणी सोडण्यात आले.
यामुळे सध्या प्रकल्पातील पाणीपातळी खालावली आहे. यासोबतच मागील काही दिवसापासून उन्हाची तीव्रता वाढल्याने पाण्याचे बाष्पीभवन होत आहे. परिणामी, पाणीसाठ्यात झपाट्याने घट होऊन पाणीसाठा ४२ टक्क्यांवर खालावला आहे.
मागील वर्षी याच काळात जिल्ह्यातील प्रकल्पात ५२ टक्के पाणीसाठा होता, हे विशेष. सध्या जिल्ह्यात मोठा प्रकल्प असलेल्या विष्णुपुरी प्रकल्पात ८२.६८ टक्के पाणी शिल्लक आहे. तर दुसरा मोठा प्रकल्प असलेल्या मानार (बारुळ) प्रकल्पात ४५ टक्के पाणीसाठा आहे.
प्रकल्पनिहाय पाणीसाठा
प्रकल्प - दलघमी- टक्केवारी
विष्णुपुरी - ६६.८०- ८२.६८
मानार- ६२.३२ - ४५
मध्यम प्रकल्प (९)- ५३.७६- ३८.६६
लघू प्रकल्प (८०)- ५८.९५- ३३.८२
उच्चपातळी बंधारे (९) - ६९.१२- ३६.४२
को.प.बंधारे (चार)- ०० - ००
एकूण प्रकल्प - ३१०.४५ - ४२.६४
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.