Soybean Production Agrowon
ताज्या बातम्या

Soybean Production : सोयाबीन उत्पादकतेत ५० टक्क्यांपेक्षा जास्त घट

Kharif Soybean Productivity : या वर्षी पावसाच्या खंडामुळे परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ४१ मंडलांतील सोयाबीनच्या यंदाच्या उत्पादनात मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के घट अपेक्षित आहे.

Team Agrowon

Parbhani News : या वर्षी पावसाच्या खंडामुळे परभणी जिल्ह्यातील ९ तालुक्यांतील ४१ मंडलांतील सोयाबीनच्या यंदाच्या उत्पादनात मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादनाच्या तुलनेत ५० टक्के घट अपेक्षित आहे.

त्यामुळे पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत सोयाबीन पिकासाठी विमा संरक्षण घेतलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर संभाव्य विमा भरपाईतून २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा पीकविमा योजना जिल्हास्तरीय संयुक्त समितीचे अध्यक्ष रघुनाथ गावडे यांनी शुक्रवारी (ता. ८) काढलेल्या अधिसूचनेद्वारे विमा कंपनीला दिले आहेत.

मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती नुकसान भरपाई निश्‍चित करण्याच्या तरतुदीनुसार जिल्ह्यातील अधिसूचित विमा क्षेत्र (मंडळ) घटकातील सोयाबीन या अधिसूचित पिकाच्या प्रातिनिधिक सूचकांच्या आधारे राज्य शासनाचे अधिकारी, विमा कंपनी प्रतिनिधी यांनी पाहणी करून अहवाल सादर केला. सोयाबीनचे उत्पादन मागील ७ वर्षांच्या उत्पादनाच्या तुलनेत यंदाचे अपेक्षित उत्पादन ५० टक्क्यांपेक्षा कमी असल्याचे निदर्शनास आले आहे.

आयसीआयसीआय लोम्बार्ड जनरल इन्शुरन्स विमा कंपनीने ही अधिसूचना जाहीर झाल्यापासून १ महिन्याच्या आत सोयाबीनसाठी ४१ मंडलांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर भरपाई रकमेच्या २५ टक्के अग्रिम रक्कम जमा करावी, असे आदेश गावडे यांनी दिले आहेत. या ४१ मंडलांतील विमाधारक शेतकरी हंगामाच्या पीक कापणी प्रयोगाद्वारे येणाऱ्या उत्पादनाच्या आधारे निश्‍चित होणाऱ्या नुकसान भरपाईसाठी पात्र राहतील.

नुकसान भरपाईची अग्रिम रक्कम अंतिम येणाऱ्या नुकसान भरपाईतून समायोजित करण्यात येईल, अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. यापूर्वी सिंगणापूर, दैठणा (ता. परभणी), जिंतूर (ता. जिंतूर), सेलू (ता. सेलू), केकरजवळा (ता. मानवत), पाथरी, बाभळगाव (ता. पाथरी), रावराजूर, पेठशिवणी (ता. पालम), ताडकळस, लिमला (ता. पूर्णा) येथे अधिसूचना काढण्यात आली आहे.

सोयाबीन उत्पादकता स्थिती (प्रतिहेक्टरी क्विंटलमध्ये)

मंडल मागील ७ वर्षांतील सरासरी उत्पादन सर्वेक्षणानुसार अपेक्षित उत्पादन

परभणी शहर १३.१० ५.९०

परभणी ग्रामीण १३.१० ६.०३

पेडगाव १०.८२ ४.७६

जांब ११.३८ ५.००

झरी ११.८१ ५.२०

पिंगळी ११.०१ ४.९५

टाकळी कुंभकर्ण ११.२७ ४.९६

सावंगी म्हाळसा ९.३६ ४.२१

बामणी ९.४१ ४.१४

बोरी १०.१८ ४.६८

आडगाव १०.४४ ४.५९

चारठाणा ९.७२ ४.३७

वाघी धानोरा ९.७९ ४.२२

दूधगाव ९.७९ ४.३१

देऊळगाव गात १०.४७ ४.६०

वालूर १०.२८ ४.६२

कुपटा १०.२९ ४.५२

चिकलठाणा ९.६३ ४.३३

मोरेगाव १०.२४ ४.७१

मानवत १०.६३ ४.६८

कोल्हा ११.२३ ४.९४

रामपुरी १०.३३ ४.५४

ताडबोरगाव ११.५७ ५.०९

हादगाव १२.७५ ५.६१

कासापुरी १२.०९ ५.३२

सोनपेठ ८.३६ ३.७६

आवलगाव ८.३० ३.७३

शेळगाव ७.९९ ३.५९

वडगाव ८.२४ ३.७१

गंगाखेड ९.३६ ४.३०

महातपुरी ६.३१ २.९०

माखणी ८.६१ ३.७९

राणीसावरगाव ८.७८ ३.८६

पिंपळदरी ७.१३ ३.१३

पालम १०.७० ४.७०

चाटोरी १२.३२ ५.५४

बनवस ८.३६ ३.८४

पूर्णा १४.६३ ६.५८

कात्नेश्‍वर १२.१४ ५.४६

चुडावा १०.०९ ४.५४

कावलगाव ११.३७ ५.११

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm To Market: आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांनी अनुभवले ‘फार्म टू मार्केट’ तंत्र

Crop Insurance Delay: मंगळवेढ्यातील ३० हजार शेतकरी विम्याच्या प्रतीक्षेत

Water Levels Drop: गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत कमालीची घट

Hailstorm Prediction : दोन दिवस गारपीटीचा अंदाज; राज्यात पुढील ५ दिवस पावसाला पोषक वातावरण

Acumen Angel Award 2025: ‘अकुमेन एंजेल अॅवॉर्ड २०२५’ साठी अमितकुमार नाफडे यांची निवड

SCROLL FOR NEXT