Monsoon Update  Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : राज्याच्या या भागातून माॅन्सून परतला

यंदा २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने ३ ऑक्टोबरपर्यंत वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राच्या काही भाग, मध्य भारताच्या काही भागातून काढता पाय घेतला.

टीम ॲग्रोवन

पुणेः मॉन्सूनचा अडखळत असलेला परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) पन्हा सुरू झालाय. आज मान्सूननं (Monsoon Update) परतीच्या वाटचालीत मोठी मजल मारली. संपूर्ण गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या बहुतांश भागासह महाराष्ट्रातील नंदूरबार, धुळे, जळगावसह खाणदेशाच्या बहुतांश भागातून मॉन्सून परतला असल्याचे हवामान विभागाने (Weather Update) स्पष्ट केलं.

तर राज्याच्या विविध भागांमध्ये आजही पावसानं हजेरी लावली. तसचं उद्या सकाळपर्यंत हवामान विभागनं राज्यात तुरळक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. यंदा २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने ३ ऑक्टोबरपर्यंत वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राच्या काही भाग, मध्य भारताच्या काही भागातून काढता पाय घेतला.

त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीस तब्बल ११ दिवसांचा ब्रेक लागला. आज उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरातच्या संपूर्ण भागासह, मध्य प्रदेशचा बहुतांशी भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि बहुतांश खाणदेशासह महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून परतला.

आज मॉन्सूनच्या परतीची सीमा राक्सल, दाल्तोनगंज, पेंद्रा रोड, छिंदवाडा, जळगाव, डहाणू भागात होती. मध्य भारताचा उर्वरित भाग, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागातून पुढील दोन दिवसांत मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली.

कोकणात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. पालघर, सिंधुदुर्ग, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. तर मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड येथे ५० मिलिमीटर पावासनं हजेरी लावली. तर पुणे, सोलापूर, सातारा, नगर या जिल्ह्यांमधील काही मंडळांमध्ये हलक्या पावसानं हजेरी लावली. तर तुरळक ठिकाणी काही वेळ जोरदार सरी पडल्या.

मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील आष्टी मंडळात तब्बल १२० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तर उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथे ७० मिलिमीटर पाऊस पडला. जालना, हिंगोली, औरंगाबाद, लातूर आणि नांदेड जिल्ह्यातही ठिकठिकाणी जोरदार सरी पडल्या. तर अनेक मंडळांमध्ये हलका पाऊस झाला.

विदर्भातही काही मंडळांमध्ये मध्यम पाऊस झाला. वाशीम, नागपूर, बुलडाणा, भंडारा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी पडल्या. हवामान विभागानं संपूर्ण कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे नगर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. तर संपूर्ण मराठवाडा आणि संपूर्ण विदर्भात विजांसह काही ठिकाणी मुसळधार पावसाचा येलो अलर्ट जारी केलाय.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Dues : थकीत ऊस बिलासाठी १० ऑगस्टला ठिय्या आंदोलन

Crop Damage Compensation: सहा जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना दिलासा, शेतपिकांच्या नुकसानीसाठी ५ कोटी ५४ लाख मदत मंजूर

MAT Stay : भूवैज्ञानिक भरतीला ‘मॅट’कडून अंतरिम स्थगिती

Farmer Loan Waiver: आधार ई-केवायसीसाठी शुल्क आकारल्यास कठोर कारवाई : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

SCROLL FOR NEXT