Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : खानदेशच्या बहुतांश भागांतून मॉन्सून परतला

नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (मॉन्सून) अडखळत असलेला परतीचा प्रवास पन्हा सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मान्सूनने परतीच्या वाटचालीत मोठी मजल मारली.

टीम ॲग्रोवन

पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांचा (Monsoon Update) (मॉन्सून) अडखळत असलेला परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) पन्हा सुरू झाला आहे. शुक्रवारी (ता. १४) मान्सूनने परतीच्या वाटचालीत मोठी मजल मारली. संपूर्ण, गुजरात, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशच्या बहुतांश भागांसह महाराष्ट्राच्या उत्तर भागातील नंदूरबार, धुळे, जळगावसह खानदेशच्या बहुतांश भागांतून मॉन्सून (Monsoon Rain) परतला असल्याचे हवामान विभागाने (Weather Update) स्पष्ट केले आहे.

यंदा २० सप्टेंबर रोजी वायव्य भारतातून परतीच्या प्रवासाला निघालेल्या मॉन्सूनने ३ ऑक्टोबरपर्यंत वायव्य भारतासह, गुजरात आणि अरबी समुद्राच्या काही भाग, मध्य भारताच्या काही भागांतून काढता पाय घेतला.

त्यानंतर मात्र परतीच्या वाटचालीस तब्बल ११ दिवसांचा ‘ब्रेक’ लागला. शुक्रवारी (ता. १४) मॉन्सूनने उत्तराखंड, उत्तर प्रदेश, गुजरातच्या संपूर्ण भागासह, मध्य प्रदेशचा बहुतांश भाग, बिहार, झारखंड, छत्तीसगड आणि बहुतांश खानदेशासह महाराष्ट्राच्या उत्तर भागातून मॉन्सून परतला आहे.

दोन दिवसांत आणखी माघार शक्य

शुक्रवारी (ता. १४) रक्सौल, डाल्टोनगंज, पेंद्र रोड, छिंदवाडा, जळगाव, डहाणू, अरबी समुद्राच्या आणखी काही भागांतून मॉन्सून परतला आहे. पुढील दोन दिवसांत मध्य भारताचा उर्वरित भाग, महाराष्ट्राचा आणखी काही भाग, पूर्व आणि ईशान्य भारताच्या काही भागांतून मॉन्सून माघार घेण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

पुणे ः नकाशातील निळी रेषा मॉन्सूनच्या परतीची सीमा दर्शवते (सौजन्य : हवामान विभाग).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Dharwad Method: तूर लागवडीची धारवाड पद्धत, हेक्टरी उत्पादन थेट २५-२६ क्विंटलपर्यंत!

Inspirational Story: गावाच्या पाणी प्रश्‍नासाठी झगडणारा सुनील

Crop Damage Compensation GR: चार जिल्ह्यांतील २२ हजार शेतकऱ्यांना दिलासा; मार्चमधील 'अवकाळी'च्या नुकसानीपोटी १६ कोटी मदत मंजूर

Krishna River: कृष्णा नदीत रविवारपर्यंत उपसाबंदी

Agrowon Podcast: काकडीला उठाव कायम; सोयाबीनमध्ये घट, कापसात चढ उतार, गव्हाचा भाव स्थिर, केळीला उठाव

SCROLL FOR NEXT