Monsoon Update Agrowon
ताज्या बातम्या

Monsoon Update : हिमाचल प्रदेशात मॉन्सूनचा तडाखा

Latest Monsoon News : हिमाचल प्रदेशात मॉन्सूनच्या पहिल्याच तडाख्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे व अचानक आलेल्या पुरामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला. इतर १० जण जखमी झाले.

Team Agrowon

Monsoon News : हिमाचल प्रदेशात मॉन्सूनच्या पहिल्याच तडाख्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळल्यामुळे व अचानक आलेल्या पुरामुळे किमान सहा जणांचा मृत्यू झाला. इतर १० जण जखमी झाले.

चंडीगड-मनाली महामार्गावर दरड कोसळल्याने मंडी ते कुल्लू दरम्यानचा रस्ता बंद झाल्याने शेकडो प्रवासी अडकून पडले. दरम्यान, हवामान खात्याने मंगळवारी (ता. २७) हिमाचल प्रदेशासाठी अतिजोरदार पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.

राज्याच्या आपत्ती विभागाचे मुख्य सचिव ओकारचंद शर्मा म्हणाले, की मुसळधार पावसामुळे अचानक आलेला पूर व दरडी कोसळल्याने आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला असून इतर १० जण जखमी झाले.

त्याचप्रमाणे ३०३ प्राण्यांनाही आपले प्राण गमवावे लागले. यासंदर्भातील सविस्तर अहवालाची प्रतीक्षा आहे. पावसामुळे तीन कोटींचे नुकसान झाल्याचा अंदाज असून दोन राष्ट्रीय महामार्गांसह १२४ रस्त्यांचेही नुकसान झाले आहे.

चंडीगड-मनाली महामार्गावर मंडीजवळ सात मैल येथे दरड कोसळल्याने वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. त्यामुळे शेकडो प्रवासी रविवारी (ता. २५) संध्याकाळपासून अडकून पडले.

खराब हवामानामुळे पोलिसांनी मंडी-कुल्लू राष्ट्रीय महामार्ग बंद करून पर्यायी मार्गाने वाहतूक वळविली होती. त्यानंतर, सुमारे २० तासांनंतर हा महामार्ग पुन्हा सुरू झाला असून सध्या महामार्गावरून छोट्या वाहनांना सोडण्यात येत आहे. रस्ता पूर्णपणू सुरू झाल्याशिवाय मंडीला न येण्याचे आवाहन प्रवाशांना करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीनच्या दरात घसरण, हरभरा दरात घसरण, टोमॅटो दरात चढ-उतार, पालक आवकेत वाढ तर डाळिंबाच्या दरात बदल

Government Assistance: शेतकरी आत्महत्येची आठ प्रकरणे मदतीसाठी पात्र

Marathwada Rain Deficit: मराठवाड्यात पावसाच्या तुटीमुळे पेरणी क्षेत्रात ७ टक्क्यांची घट

Buldhana DCC Bank: बुलडाणा जिल्हा बँकेवर सहकार पॅनेलचे वर्चस्व

Maharashtra Rain Alert: राज्यात १० जिल्ह्यांना पावसाचा येलो अलर्ट; दोन दिवस पावसाचा अंदाज

SCROLL FOR NEXT