Sangali Rain Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update: सांगली जिल्ह्यात अनेक ठिकाणी मध्यम पाऊस

सांगली, मिरज शहरासह तासगाव, कडेगाव, कवठे महांकाळ, आटपाडी तालुक्यांत चांगला पाऊस झाला.

Team Agrowon

सांगली : जिल्ह्यात सोमवारी (ता. ५) सायंकाळी पाचनंतर अनेक ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस (Rain) झाला. सांगली, मिरज शहरासह तासगाव, कडेगाव, कवठे महांकाळ, आटपाडी तालुक्यांत चांगला पाऊस झाला. हा पाऊस खरीप पिकांना पोषक ठरणार आहे. परंतु या पावसामुळे द्राक्ष फळ छाटणी लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून हवामान ढगाळ आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वीही जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यात दमदार पाऊस झाला होता. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांना हा पाऊस पोषक ठरत असल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

सोमवारी सायंकाळी मिरज विटा आटपाडी या तालुक्यांमध्ये हलका पाऊस झाला. इतर भागांमध्ये रिमझिम पाऊस सुरू होता. सध्या द्राक्षाच्या फळ छाटणीची तयारी शेतकरी करू लागला आहे. परंतु हा पाऊस द्राक्ष फळ छाटणीसाठी अडचण ठरू शकते, अशी माहिती शेतकऱ्यांनी दिली. मंगळवार सकाळपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. दुपारपासून दुष्काळी पट्ट्यात पावसाची रिपरिप सुरू होती.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT