सोपा म्हणतेय, सोयाबीन पीक जोमात

सोयाबीन पीक तण आणि कीड-रोगापासून मुक्त असल्याचा सोपाचा दावा
Soybean
SoybeanAgrowon

पुणेः देशात चालू खरिपातील सोयाबीन (Soybean) पिकाला पाऊस आणि कीड-रोगांचा (Pest Disease) फटका बसत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीन उत्पादन गेल्यावर्षीपेक्षा कमीच राहण्याचा अंदाज आहे. मात्र सध्या सोयाबीन पिकाची स्थिती (Crop condition) चांगली असून येलो मोझॅकसारख्या रोगाचा प्रादुर्भाव कुठेच नसल्याचा दावा सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशनने केला आहे.

देशात सध्या सोयाबीनची पेरणी (Soybean Sowing) गेल्यावर्षीपेक्षा काहीशी घटली आहे. तसंच जुलै आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या पावसानं पिकाचं नुकसान (Crop Damage) केल्याचं शेतकऱ्यांनी कळवलं. तर अनके भागांत कीड-रोगांचाही परिणाम सोयाबीन पिकावर झाला. मात्र देशातील सोयाबीन पीक हे सामान्य ते चांगल्या स्थितीत आहे, असा दावा सोयाबीन प्रोसेसर्स असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सोपानं केलाय. देशातील सोयाबीन पिकाची वाढ अतिशय चांगली झालेली असून बहुतेक पीक हे फुले आणि शेंगा भरण्याच्या स्थितीत आहे, असंही सोपानं (SOPA) म्हटलंय.

Soybean
Cotton Rate : कापसाच्या वायद्यांवर सरसकट बंदी नाही

सोपाच्या समितीने ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात देशातील सोयाबीन पिकाची पाहणी केली. या समितीने महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान या तीन राज्यांतील ५ हजार ७८७ किलोमीटर पिकाची पाहणी केल्याचं सोपानं म्हटलंय. या समितीने सोयाबीन पिकाची स्थिती आणि पेरणी याविषयी निरिक्षण करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांशी संवादही साधला, असं सोपानं स्पष्ट केलंय.

बहुतांश सोयाबीन पीक तणमुक्त आणि कीड-रोगापासून मुक्त आहे, असाही दावा सोपानं केलाय. मात्र महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील काही जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाला पावसाचा फटका बसला. काही ठिकाणी सोयाबीन शेतांमध्ये पाणी साचले. परिणामी सोयाबीनची पाने पिवळी पडली त्यामुळं या भागांमधील उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही राज्यात सोयाबीनवर येलो मोझॅक रोगाचा प्रादुर्भाव दिसला नाही, असंही सोपानं म्हटलंय. सोपा सोयाबीन पिकाची स्थिती चांगली असल्याचा दावा करत आहे.

Soybean
Tur Dal: तुरीची डाळ दुधापैक्षा जास्त पोष्टिक

मात्र प्रत्यक्ष शेतकरी सांगत असलेली स्थिती वेगळी दिसते. महाराष्ट्रात मराठवाडा आणि विदर्भात सोयाबीन मुख्य पीक आहे. या दोन्ही विभागांमध्ये सोयाबीनला पाऊस आणि कीड-रोगांच्या प्रादुर्भावामुळे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे सोपाच्या पीक परिस्थितीच्या दाव्यावरून शेतकरी नाराजी व्यक्त करत आहेत. तर बाजारात सोमवारी सोयाबीन दरात ३०० रुपयांपर्यंत घसरण पाहायला मिळाली. सोयाबीनला ४ हजार ७०० ते ५ हजार १०० रुपये दर मिळतोय.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com