MIllet Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Bajari Sowing : बाजरी पेरणी १५ हजार हेक्टरवर

Millet Crop Sowing : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि पावसाच्या खंडामुळे पिको माडावी लागली.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात यंदा पाऊस लांबल्याने आणि पावसाच्या खंडामुळे पिको माडावी लागली. अशात पेरण्या उशिरा कराव्या लागत आहेत. बाजरीची पेरणी नंदुरबार, धुळे, जळगावांत वाढली आहे.

तसेच अनेकांनी ताग पिकासही पसंती दिली आहे. बाजरीचे खरिपातील क्षेत्र खानदेशात १० ते १२ हजार हेक्टरपर्यंत असते.

मका, ज्वारी पीक अधिक असते. पण यंदा ज्वारीचे क्षेत्र किंचित कमी झाले आहे. तर बाजरीचे क्षेत्र वाढले आहे. बाजरी पेरणी सुरूच आहे. नंदुरबार, धुळ्यात बाजरीची पेरणी अधिक आहे. धुळ्यातील साक्री, शिंदखेडा व नंदुरबारमधील नंदुरबार, नवापूर, तळोदा भागांत बाजरी पीक अधिक आहे. जळगाव जिल्ह्यात बाजरीचे क्षेत्र स्थिर आहे.

सुमारे १५ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पेरणी आणखी होत आहे. क्षेत्र यंदा वाढेल. नेमके आकडे पुढील तीन दिवसांत येतील, अशी माहिती आहे. तुरीसह बाजरीची पेरणी नंदुरबारात सुरू आहे. सोयाबीन, ज्वारी, कापूस, मूग ही पिके पेरणीची मुदत संपत आल्याने शेतकरी बाजरीकडे वळले आहेत.

चारा व धान्य, या उद्देशातून बाजरी पेरणी झाली आहे. कोरडवाहू शेतीधारक शेतकऱ्यांसमोर सध्या तूर व बाजरीचाच पर्याय आहे. यात बाजरीला अनेक शेतकरी पसंती देत असल्याचे सांगण्यात आले. कमी पावसात व कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची शेतकरी पेरणीला निवड करीत आहेत.

बाजरीची पेरणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यातदेखील होईल. यामुळे बाजरी पेरणीबाबतचा अंतिम अहवाल लवकरच जाहीर होईल. खानदेशात शिंदखेडा, साक्री, जळगावमधील चाळीसगाव, भडगाव परिसर बाजरीसाठी प्रसिद्ध आहे. याच भागात पेरणीदेखील होत आहे. पण यंदा नंदुरबारात पेरणी वाढत आहे, असे सांगण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT