
Pune News : जिल्ह्याच्या पूर्व भागात पाऊस कमी प्रमाणात पडल्याने बाजरीचा पेरा कमी झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पूर्ण आर्थिक गणितच बिघडलेले आहे. चालू वर्षी मॉन्सूनपूर्व पाऊस जिल्ह्यात पुरेसा पडला नसल्याने, तसेच जुलै महिन्यात रिमझिम पाऊस पडला आहे. भविष्यात शेतकरीवर्गाला पाण्याची टंचाई जाणवणार असल्याने शेतकरीवर्ग चिंतेत आहेत.
खरीप हंगामातील पिकांच्या पेरण्या मागील वर्षीच्या तुलनेत अत्यंत कमी प्रमाणात झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. एक जून ते ४ ऑगस्ट या कालावधीत हवेली तालुक्यात अवघा २५ टक्के पाऊस पडला आहे. तर शिरूरमध्ये २७ टक्के, बारामतीमध्ये १८ टक्के, इंदापूर २७ टक्के, दौंडमध्ये २९ टक्के, पुरंदरमध्ये २३ टक्के पाऊस पडला आहे. हा अत्यंत कमी पाऊस पडला आहे. त्यामुळे या भागातील पेरणीच्या क्षेत्रात फारशी वाढ झालेली नाही.
यंदा जून, जुलै महिन्यांत शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होते; मात्र पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे अनेक शेतकरी ज्वारी पेरणी करावी की बाजरी उत्पन्न घ्यावे, या द्विधा मनःस्थितीत आहेत. अजूनही दमदार पाऊस झाला नसल्याने व पुढे होईल, अशा चिंतेत शेतकरी अडकला आहे. जिल्ह्यात खरिपाचे एक लाख सरासरी ९५ हजार ७१० हेक्टर क्षेत्र आहे.
त्यापैकी आतापर्यंत एक लाख ४० हजार ८८८ हेक्टर म्हणजेच ७२ टक्के पेरणी झाली आहे. यामध्ये बाजरीचे सरासरी ४७ हजार ५१८ हेक्टर एवढे क्षेत्र आहे. त्यापैकी आतापर्यंत अवघे १८ हजार ८८६ हेक्टर म्हणजेच अवघे ४० टक्के पेरणी झाली आहे. सरासरीच्या तुलनेत बाजरी पेरणीचा पेरा चांगलाच घटला आहे.
आता जुलै महिना सुरू झाला आहे. त्यामुळे जवळपास पेरण्याचा हंगाम उरकल्यात जमा आहे. आता बाजरीची पेरणी होणार नसल्याने मोठ्या प्रमाणात खरिपाचे क्षेत्र हे बाजरी पिकापासून दूर राहणार असल्याचे चित्र आहे. सध्या ज्या ठिकाणी पेरण्या झाल्या आहेत, तेथील पिकांची वाढ खुटल्यात जमा असून, काही ठिकाणी पिके सुकू लागली आहेत.
पुणे जिल्ह्यात तालुकानिहाय पेरणी (हेक्टरमध्ये)
तालुका -- सरासरी क्षेत्र --- झालेली पेरणी -- टक्के
हवेली -- ११३१ -- ४६० -- ४१
भोर -- १०० -- ४३ -- ४३
मावळ -- १ -- ० -- ०
जुन्नर -- २३४२ -- ४०९ -- १७
खेड -- ३१५ -- ० -- ०
आंबेगाव -- २०४६ -- १४९० -- ७३
शिरूर -- १७७२३ -- ९०८५ -- ५१
बारामती -- ७२६५ -- १७७४ -- २४
इंदापूर -- ११८९ -- ४०३ -- ३४
दौंड -- ३०७८ -- १५०२ -- ४९
पुरंदर -- १२३२७ -- ३७२१ -- ३०
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.