Tomato Rate Agrowon
ताज्या बातम्या

Tomato Rate Control : टोमॅटो दर नियंत्रणासाठी सरकारच्या हालचारी सुरू ; कृषी आयुक्तांकडून बैठक

Tomato Price Hike : गेल्या महिनाभरापासून संपूर्ण भारतात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी टोमॅटोचे भाव २०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. सध्या बाजारात वाढलेले टोमॅटोचे दर व त्याबाबत उपाययोजना करण्यासाठी कृषि आयुक्त सुनील चव्हाण यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेण्यात आली.

Team Agrowon

Agriculture Department : देशभरात टोमॅटोचे भाव गगनाला भिडले आहे. टोमॅटोचे दर नियंत्रणात आणण्यासाठी सरकार हालचाली करीत आहे. कृषी आयुक्तालयाच्या‌वतीने नुकतीच राज्यातील कृषी अधिकाऱ्यांची यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत टोमॅटो लागवड, उत्पन्न आणि दर नियंत्रणाबाबत आढावा घेतला.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांचे अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत कृषी विद्यापीठाचे कुलगुरू, संशोधन संचालक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उपस्थित होते. राज्यात टोमॅटो पिकाखाली सर्वसाधारण 57 हजार हेक्टर क्षेत्र आहे. खरीप हंगामात सर्वसाधारणपणे 42 हजार हेक्टर रब्बी आणि उन्हाळी हंगामात सर्वसाधारण 16 ते 17 हजार हेक्टर क्षेत्र असते. यापासून सर्वसाधारणपणे 10 लाख मेट्रिक टन उत्पादन अपेक्षित असते.

या बैठकीत टोमॅटो पिकाखालील खरीप 2023 हंगामातील क्षेत्र आणि उत्पादन याबाबत माहिती तात्काळ सादर करण्याच्या सूचना कृषी आयुक्तांनी दिल्या आहेत. राज्यात डिसेंबर 2022 ते मे 2023 दरम्यान टोमॅटोला बाजारात अतिशय अल्प दर मिळाल्याने डिसेंबर 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान 6 ते 2 रुपये प्रति किलो, मार्च 2023 दरम्यान 11 रुपये प्रति किलो आणि एप्रिल 2022 ते मे 2023 दरम्यान 8 ते 9 रुपये प्रति किलोच्या आर्थिक नुकसानीस शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले. त्यामुळे नवीन टोमॅटो लागवडीवर त्याचा विपरीत परिणाम झाल्याचे प्रथम दर्शनी दिसून येत आहे.

या व्यतिरिक्त मार्च, एप्रिल, मे महिन्यात अवेळी पाऊस, गारपीट यामुळे देखील टोमॅटो आणि इतर भाजीपाला यांचे नुकसान झाल्याने त्याचा उत्पादनावर विपरीत परिणाम झाला असल्याचे दिसून येते. चालू वर्षी पाऊस देखील जून महिन्यात जवळपास 15 दिवस उशिरा आला आणि तो सरासरीच्या जेमतेम 54% झाला. यामुळे नवीन लागवडीस उशीर झाला असल्याचे आढळून येते. टोमॅटो पिकावरील कीड व रोग याबाबत देखील या बैठकीत चर्चा करून नवीन जाती, कीड आणि रोग प्रतिबंधात्मक उपाय योजना यावर चर्चा करण्यात आली.

सद्या शेतकरी नविन टोमॅटोची लागवड करत आहेत याबाबत येत्या 7-8 दिवसात वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होईल. टोमॅटो लागवडीबाबत नाशिक, अहमदनगर, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, लातूर, नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रमुख क्षेत्र असून त्या जिल्ह्यांच्या अधीक्षक कृषी अधिकारी यांचेकडून प्रामुख्याने नवीन लागवडी बाबत सविस्तर अहवाल मागविण्यात आला आहे. तो प्राप्त होताच टोमॅटो लागवड, उत्पन्न व भाव याबाबत अधिक वस्तुस्थिती स्पष्ट होईल. यामुळे भाव नियंत्रणास मदत होईल, असे कृषी आयुक्तालयाकडूनस्पष्ट करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT