Tomato Rate: टोमॅटो दराला रोखण्यासाठी केंद्र सरकारनं उपसलं हत्यार!

Team Agrowon

लाल चिखल

अपेक्षित दर नव्हते तेव्हा उत्पादक शेतकऱ्यांना टोमॅटो फेकून द्यावा लागला. त्यामुळे अनेक बाजारपेठा आणि बांधांवर लाल चिखल पाहायला मिळाला.

Tomato | Agrowon

चांगला दर मिळतोय

काही शेतकऱ्यांना १ ते २ रुपये किलो दराने विक्री करावी लागली. मात्र आता शेतकऱ्यांना चांगला दर मिळत आहे.

Tomato | Agrowon

केंद्र सरकारची खेळी

किरकोळ बाजारात टोमॅटोच्या दरात तेजी आहे. तर ग्राहकांच्या खिशाला झळ बसत आहे. त्यामुळे केंद्र सरकार टोमॅटोचे वाढलेल्या दराला आळा घालण्यासाठी सरसावले आहे.

Tomato | Agrowon

टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश

ग्राहक व्यवहार विभागाने राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महासंघ (नाफेड) आणि राष्ट्रीय सहकारी ग्राहक महासंघ (एनसीसीएफ) यांना आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्रातील बाजारांमधून त्वरित टोमॅटो खरेदी करण्याचे निर्देश दिले आहेत.

Tomato | Agrowon

टोमॅटोच्या दराने सर्वोच्च वाढ

जेणेकरून गेल्या महिन्याभरात टोमॅटोच्या दराने सर्वोच्च वाढ नोंदवलेल्या प्रमुख विक्री केंद्रांमध्ये टोमॅटो वितरित करता येईल. 

Tomato | Agrowon

टोमॅटो सवलतीच्या दरात वितरित

या शुक्रवार (ता. १४)पर्यंत टोमॅटोचा साठा किरकोळ दुकानांच्या माध्यमातून राजधानी दिल्ली क्षेत्रातील ग्राहकांना सवलतीच्या दरात वितरित केला जाईल.

Tomato | Agrowon
sitafal | Agrowon
अधिक पाहण्यासाठी क्लिक करा