Marijuana
Marijuana  Agrowon
ताज्या बातम्या

Marijuana Farming : अफू, गांजाच्या शेतीस परवानगी मिळावी

Team Agrowon

Marijuana Farming पुणे : अफू आणि गांजाची शेती (Marijuana Farming) करण्याची परवानगी मिळावी यासाठी पुणे जिल्ह्यातील काँग्रेसच्या (Congress) एका जिल्हास्तरीय नेत्याने पत्राद्वारे थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ग्रामपंचायतीच्या अवाजवी कर आकारणीमुळे हतबल झालेल्या काँग्रेसच्या नेत्याकडेही मागणी केल्याने सगळेच अवाक झाले आहेत.

काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस नंदकुमार चौधरी यांनी ही मागणी पत्राद्वारे केली आहे. तर चौधरी हे शेतकरी असून, त्यांनी २००७ पासून कॉन्ट्रॅक्ट ब्रॉयलर फार्मिंग करत असून, शासनाच्या चुकीच्या निर्णयामुळे बळी जात असलेल्या शेतकऱ्यांच्या यादीत यांचा समावेश आहे.

कुक्कुटपालन आणि गाई-म्हशीपालन हा व्यवसाय शेतीपूरक मानला गेला आहे. ज्याप्रमाणे शेती निसर्गावर अवलंबून असते, तसेच शेतकऱ्याच्या कोणत्याही पिकाला शासन हमीभाव देत नाही.

त्याचप्रमाणे पोल्ट्री व्यवसायदेखील हा या लहरी निसर्गावरती आणि करार (कॉन्ट्रॅक्ट) करणाऱ्या कंपन्यावरती अवलंबून आहे. शासनाने करार पद्धतीने कार्यरत असणाऱ्या कंपन्यावरती नियंत्रण ठेवलेले दिसून येत नाही.

म्हणून ते सर्रास पोल्ट्रीधारक शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे पिळवणूक करत आलेले आहेत, अशी व्यथा त्यांनी पत्राद्वारे मांडली आहे.

कोरोना काळापासून पोल्ट्री व्यवसाय अत्यंत अडचणीत सापडला असून, या व्यवसायाला शासन कोणत्याही प्रकारची मदत करत नसल्यामुळे सदर व्यवसाय करणे कठीण झाले आहे.

तरीसुद्धा माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी शेडमध्ये अफू व गांजा हे पीक घेण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी श्री. चौधरी यांनी पुणे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि हवेली तहसीलदार यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

राज्यात पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या कंपन्यांमुळे, या व्यवसायाला योग्य भाव मिळत नसल्याने आधीच शेतकरी अडचणीत सापडले आहे. त्यातच ग्रामपंचायतीकडून व्हॅल्यूएशन रेडी रेकनर वाढविल्यामुळे अवाजवी कर आकाराला जात आहे. प्रशासनाने शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेऊन यातून तत्काळ मार्ग काढावा.

- नंदकुमार चौधरी, पुणे जिल्हा सरचिटणीस, काँग्रेस

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Heat Wave : मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेचा इशारा

Tamarind Season : तासगाव बाजार समितीत चिंच हंगाम अंतिम टप्प्यात

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

SCROLL FOR NEXT