Bedana Subsidy Agrowon
ताज्या बातम्या

Bedana Subsidy : बेदाण्याला अनुदानासाठी सांगलीत स्वाभिमानी संघटनेचा मोर्चा

Raisin Rate : गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेदाणा आणि द्राक्षाला अनुदान मिळावे यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर मागणी मान्य करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता.

Team Agrowon

Sangli News : द्राक्ष आणि बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि द्राक्षाला एकरी एक लाख, तर बेदाण्याला प्रति टनाला एक लाख रुपये अनुदानाच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतकऱ्यांना सोबत घेऊन बुधवारी (ता. ८) चड्डी मोर्चा काढला. मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर नग्न मोर्चा काढू असा इशारा दिला.

गेल्या पंधरा दिवसांपूर्वी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने बेदाणा आणि द्राक्षाला अनुदान मिळावे यासाठी मोर्चा काढला होता. त्यानंतर मागणी मान्य करण्यासाठी पंधरा दिवसांचा कालावधी दिला होता.

मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पालकमंत्री व राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांच्या घरावर मोर्चा काढणार, असा इशारा दिला होता. परंतु पोलिसांनी बंदीचे आदेश लावल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. या वेळी शेतकरी उपस्थित होते.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांच्या नेतृत्वाखाली हा चड्डी मोर्चा काढला. विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे देण्यात आले.

या पुढच्या काळामध्ये जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर वेळ प्रसंगी नग्न मोर्चा काढू, असा इशारा या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton Cultivation Tips: कपाशी लागवडीची पंचसूत्री

Soybean Milk Benefits: सोयाबीन दूध नवजात करडांसाठी फायदेशीर

Cattle Feed Price: दुग्धव्यवसाय तोट्यात; पशुखाद्याच्या दरात वाढ झाली आहे का? पशुसंवर्धनमंत्र्यांचा मोठा खुलासा

Soybean BBF Sowing: सोयाबीनची बीबीएफवर लागवड फायदेशीर! काय आहे बीबीएफ?

Cattle Breeding: गोवंशामधील वळू निवड पद्धतीतील बदल

SCROLL FOR NEXT