APMC Election Agrowon
ताज्या बातम्या

APMC Election In Marathwada : मराठवाड्यात अनेक प्रस्थापितांना धोबीपछाड

मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरवर भाजप शिवसेनेने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे.

Team Agrowon

APMC Election Marathwada मराठवाड्यातील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरवर भाजप शिवसेनेने (Shivsena) निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे.

बाजार समितीच्या १५ जागापैकी ११ जागा भाजप- शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात गेल्या आहेत. तर महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) फक्त ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे.

हा जनतेने दिलेला कौल असून, भाजप शिवसेनेच्या कामांवर विश्‍वास असल्याचे मत माजी सभापती राधाकिसन पठाडे यांनी व्यक्त केले. या विजयानंतर विजयी उमेदवारांनी जालना रोडवर गुलाल उधळत मोठा जल्लोष साजरा केला.

वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व भाजप युतीचा दणदणीत विजय झाला आहे. या निवडणुकीत एकूण १८ जागापैकी ११ जागेवर युतीच्या उमेदवार विजयी झाले आहे. महाविकास आघाडीला केवळ ७ जागांवर समाधान मानावे लागले.

लातूर जिल्ह्यात काँग्रेसची २, तर भाजपची २ समित्यांवर सत्ता

लातूर जिल्ह्यातील लातूर बाजार समितीवर झालेल्या माजी मंत्री आमदार अमित देशमुख यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पुरस्कृत नेतृत्वाखालील पॅनेलचे सर्वच्या सर्व उमेदवार विजयी झाले असून, त्यांनी भाजप पुरस्कृत पॅनेलच्या उमेदवारांना पराभवाची धूळ चारली आहे.

औसा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या झालेल्या निवडणुकीत भाजपने महाविकास आघाडीचा धुव्वा उडवत १८ पैकी १६ जागा जिंकल्या. बाजार समितीच्या इतिहासात प्रथमच भाजपने सर्वाधिक १६ जागा पटकावत एकहाती विजय मिळवला.

उदगीर बाजार समितीवर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी पुरस्कृत लोकनेते विलासराव देशमुख शेतकरी विकास पॅनेलने एकूण १८ पैकी १७ जागांवर विजय मिळवला, तर भाजपाला एकाच जागेवर समाधान मानावे लागले. चाकूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत भाजपचे १०, तर महाविकास आघाडीचे आठ उमेदवार विजयी झाले आहेत.

धाराशिवमधील आठपैकी पाच ठिकाणी ‘महाविकास’ची सत्ता

जिल्ह्यामध्ये १८ बाजार समितीपैकी ठिकाणी महाविकास आघाडीने सत्तास्थापन करीत भाजप व शिवसेनेला (शिंदे गट) धक्का दिला आहे. भूम, तुळजापूर व धाराशिव या ठिकाणी राज्यात सत्ताधारी असलेल्या भाजप-शिंदे गटाने वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

मात्र महाविकास आघाडीने उमरगा व मुरुम, परंडा, वाशी, कळंब या बाजार समितीवर सत्ता आणली आहे. उमरगा व मुरुम या ठिकाणी माजी आमदार बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली विजय मिळविला आहे.

बीडमध्ये पाच बाजार समित्यांवर आघाडीची बाजी; केजमध्ये भाजप

बीड जिल्ह्यात सहा बाजार समित्यांची निवडणुक झाली. परळी, गेवराई, अंबाजोगाई, वडवणी या ठिकाणी आघाडीने बाजी मारली आहे.

तर केवळ केज कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजपचे ज्येष्ठ नेते रमेशराव आडसकर यांच्या नेतृत्व करत आमदार नमिता मुंदडा यांच्या साथीने भाजपप्रणीत आघाडीची सत्ता कायम ठेवण्यात यश मिळविले.

उर्वरित पाच बाजार समित्यांच्या निकालात तीन ठिकाणी महाविकास आघाडीप्रणीत, तर बीडमध्ये विविध पक्षांच्या परिवर्तन आघाडीने बाजी मारली. केवळ केज कृषी उत्पन्न बाजार समितीवर भाजपला सत्ता राखता आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Majhi Ladki Bahin Yojana: 'माझी लाडकी बहीण' योजनेचा जून महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात; मंत्री आदिती तटकरेंची ट्विटद्वारे माहिती

RCGF gas Leak : वायू गळतीमुळे हजारो शेतकऱ्यांची भातशेती नापीक

Wet Drought : सुधागड तालुक्यामध्ये ओल्या दुष्काळाची स्थिती

eKYC : ‘शासन आपल्या दारी’तून घरपोच ई-केवायसी

Animal Vaccination : सोलापूर जिल्ह्यात १६ लाख जनावरांचे मॉन्सूनपूर्व लसीकरण पूर्ण

SCROLL FOR NEXT