Mango Season Agrowon
ताज्या बातम्या

Mango Season : सिंधुदुर्गच्या पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम धोक्यात

बदलत्या वातावरणाचा मोठा फटका दिवसेंदिवस आंबा, काजू पिकाला बसत आहे. जिल्ह्यात यावर्षी सुरवातीपासूनच हापूसला वातावरणाचा फटका बसला.

Team Agrowon

Sindhudurg News ः जिल्ह्याच्या पूर्वपट्ट्यात हापूसला (Hapus Mango) अजूनही मोहोर येत आहे. त्यामुळे या भागातील आंबा तयार होण्यास जून महिना उजाडणार आहे. परिणामी, पूर्वपट्ट्यातील आंबा हंगामासमोर (Mango Season) प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.

बदलत्या वातावरणाचा मोठा फटका दिवसेंदिवस आंबा, काजू पिकाला बसत आहे. जिल्ह्यात यावर्षी सुरवातीपासूनच हापूसला वातावरणाचा फटका बसला. पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात किरकोळ प्रमाणात मोहोर आला.

त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात मोहोर आला. मात्र हा मोहोर वाढलेले तापमान आणि दाट धुके यामुळे फारसा टिकला नाही.

जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील आंबा हंगाम सध्या सुरू झाला आहे. असे असले तरी पूर्वपट्ट्यातील आंबा हंगामाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पूर्वपट्टयात आंब्याला आता मोहोर फुटण्याची प्रकिया सुरू झाली आहे. हा आंबा तयार होण्यासाठी किमान ८० दिवसांचा कालावधी लागणार आहे.

त्यामुळे आता मोहोर येत असलेला आंबा २० जूननंतर तयार होईल. त्या कालावधीत जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू असतो. त्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा हंगाम संकटात सापडण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात सध्या दिवसा तापमानात वाढ आणि रात्री थंडी असे वातावरण आहे. थंडी वाढल्यामुळे हा मोहोर फुटत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

सलग दोन वर्षे नुकसान

पूर्वपट्ट्यातील आंबा गेल्या वर्षी देखील २० मे नंतर तयार व्हायला सुरवात झाली होती. त्याच कालावधीत मॉन्सूनपूर्व पावसाला सुरवात झाली. त्यामुळे आंब्याचे नुकसान झाले. सलग दुसऱ्या वर्षी आंब्याचे नुकसान होत असल्यामुळे पूर्वपट्ट्यातील आंबा बागायतदार चिंतेत आहेत.

गेल्या आठ दहा दिवसांपासून रात्री थंडीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मोहोर फुटत आहे. परंतु हा आंबा तयार होण्यास किमान ८० दिवसांचा कालावधी लागेल. त्यामुळे बागायतदार कॅनिंगसाठीच या आंब्याचा उपयोग करू शकतील. त्या दृष्टीनेच उत्पादन घ्यावे.
- डॉ. विजय दामोदर, शास्त्रज्ञ, आंबा फळ संशोधन उपकेंद्र, रामेश्वर, देवगड.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT