Mango MSP Agrowon
ताज्या बातम्या

Famer Loan Waive : आंबा बागायतदारांना सरसकट कर्जमाफी द्यावी

Mango Farmer Karjmafi : सर्व बागायतदारांचे सुमारे ४०० कोटी कर्ज असले. शासनाने सरसकट आंबा बागायतदारांना कर्ज माफी द्यावी, अशी मागणी करण्यात येईल,’’ अशी माहिती पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बाबा साळवी यांनी दिली.

Team Agrowon

Ratnagiri News : ‘‘शासन आपल्या दारी’, या योजनेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे २५ मे रोजी रत्नागिरी दौऱ्यावर आहेत. या वेळी आम्ही सर्व आंबा बागायतदार त्यांची भेट घेणार आहोत. गेल्या आठ वर्षांमध्ये निसर्ग दुष्टचक्रामुळे आंबा उत्पन्न धोक्यात आहे.

यंदा तर १५ टक्केही उत्पन्न नाही. कामगारांचा पगार, औषधांचा खर्च अंगावर आला आहे. सर्व बागायतदारांचे सुमारे ४०० कोटी कर्ज असले. शासनाने सरसकट आंबा बागायतदारांना कर्ज माफी द्यावी, अशी मागणी करण्यात येईल,’’ अशी माहिती पावस परिसर आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष बाबा साळवी यांनी दिली.

शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत साळवी बोलत होते. या वेळी अनेक आंबा बागायतदार उपस्थित होते.

साळवी म्हणाले, ‘‘मुख्यमंत्र्यांची भेट मिळावी, यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा केली जाईल. यंदाही आंबा हंगाम खराब गेला. दरवर्षी अशी परिस्थिती उद्‌भवत असल्याने शेतकरी उद्‌ध्वस्त झाला आहे.

बागेच्या मशागतीसाठी लागणारा खर्च, कामगारांचा पगार आदींमुळे कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. शासनाने नियमित कर्ज फेड करणाऱ्यांना ५० हजार रुपयांचा प्रोत्साहन भत्ता देण्याची घोषणा केली आहे.

परंतु अद्याप ५ टक्केच शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. उर्वरित ९५ टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर अजूनही रक्कम पडलेली नाही. ती केव्हा मिळणार आहे हे माहीत नाही. ते मिळावे, ही मागणी तेव्हा मुख्यमंत्र्यांकडे करू.’’

यापूर्वीच्या कर्जाचे पुर्नरगठण करून देण्याची घोषणा शासनाने केली होती. शासन त्याचे व्याज भरणार होते. त्याचेही पुढे काही झाले नाही. आंबा बागायतदार कर्जाच्या बोजाखाली दबला आहे.

त्यामुळे शासनाने सरसकट कर्जमाफी करावी, अशी आमची प्रमुख मागणी आहे. शासनाला यासाठी ४०० कोटींची तरतूद करावी लागणार आहे. आतापर्यंत कोकणातील शेतकऱ्यांनी कोणतीच कर्जमाफी मागितलेली नाही.

‘जूनमध्ये आंबा परिषद घेण्याचा विचार’

‘‘जूनमध्ये आंबा परिषद घेण्याचा विचार आहे. तेव्हा आम्ही पुढील निर्णय जाहीर करू. रत्नागिरी हापूसच्या नावाखाली खुलेआम कर्नाटकच्या आंब्यांची विक्री सुरू आहे. परंतु यावर नियंत्रण ठेवणारी एकही शासकीय यंत्रणा नाही, ही सर्वांत मोठी दुर्दैवी बाब आहे,’’ अशी खंत साळवी यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Satara DCC Bank Election : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आठ ठराव रद्द

Cattle Feed Shortage : अहिल्यानगर जिल्ह्यात चार महिने पुरेल एवढाच चारा उपलब्ध

Yavatmal Drought : अन्यथा नेत्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही

Cotton Pink Bollworm: गुलाबी बोंड अळीचा कापसावर वाढता धोका

Loan Waiver Scheme : कर्जमुक्ती योजनेच्या दुसऱ्या यादीत ४० हजार शेतकऱ्यांचा समावेश

SCROLL FOR NEXT