Raju Shetti Agrowon
ताज्या बातम्या

Raju Shetti : राज्यात शेतकऱ्यांचे प्रमुख प्रश्‍न दुर्लक्षितच

पंधरा, वीस हजार रुपयांसाठी देशामध्ये शेतकरी आत्महत्या करत आहेत. राज्यात मात्र चर्चा खोक्यांची, फडतूस अन् काडतुसांची सुरू आहे.

Team Agrowon

Satara Agriculture News : पंधरा, वीस हजार रुपयांसाठी देशामध्ये शेतकरी आत्महत्या (Farmer Suicide) करत आहेत. राज्यात मात्र चर्चा खोक्यांची, फडतूस अन् काडतुसांची सुरू आहे.

त्यामुळे बळीराजाचे प्रमुख प्रश्‍न दुर्लक्षित झाले असून, स्वतःची टिमकी वाजविण्यासाठी वीस का तीस श्री सदस्यांचा जीव घेणाऱ्यांना सामान्यांच्या व्यथा, वेदना काय समजणार, अशी खंत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी व्यक्त केली.

कऱ्हाड (जि. सातारा) येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेच्या पुरस्कार वितरण कार्यक्रमानंतर शेट्टी पत्रकारांशी बोलत होते. या वेळी ‘स्वाभिमानी’चे जिल्हाध्यक्ष देवानंद पाटील उपस्थित होते.

खासदार शेट्टी म्हणाले, की मागितल्याशिवाय मिळणार कसं? आईसुद्धा लेकरू रडत नाही तोपर्यंत दूध पाजत नाही. हे तर सरकार आहे. वीस-वीस लोकांचा बळी घेऊन स्वतःचं प्रेझेंटेशन करणारे हे सरकार आहे.

यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण? स्वतःची टिमकी वाजविण्यासाठी २० ते ३० लोकांचा जीव घेणाऱ्या लोकांना सामान्यांच्या व्यथा वेदना काय समजणार? अक्षरशः पंधरा, वीस हजार रुपयांसाठी देशामध्ये शेतकरी आत्महत्या होत आहेत. मात्र राज्यात चर्चा खोक्यांची, फडतूस अन् काडतुसांची आहे, प्रमुख प्रश्‍न मात्र दुर्लक्षित आहेत.

ते म्हणाले, की अवकाळी पावसामुळे राज्यात झालेल्या नुकसानीबाबत सरकार ज्या ज्या उपाययोजना करण्याच्या घोषणा करत आहे. त्यावर मी समाधानी नाही.

गेले पंधरा दिवस शेतकऱ्यांचा आक्रोश सरकारपर्यंत पोहोचत नाही. दोन दिवसांत नुकसान भरपर्इ मिळणार असल्याचे सांगूनही प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या हातात काहीच नाही.

सरकारी अधिकाऱ्यांच्या संपामुळे नीट पंचनामे झाले नाहीत. रोज गारपीट होतेय, मात्र सरकार गांभीर्याने घ्यायला तयार नाही. सरकारबद्दल कीव वाटायला लागली आहे. यांना शेतकऱ्यांच्या प्रश्‍नांशी काही देणे घेणे नाही.

विरोधी पक्षांकडूनही निराशाच

सद्यःस्थितीतील राज्यातील राजकीय घडामोडींमध्ये काही तथ्य नसून हा खेळ सावल्यांचा असाच प्रकार आहे. विरोधी पक्ष विरोधी पक्षासारखा वागत नाही. जनतेच्या भावनांशी खेळ चालू आहे. विरोधी पक्ष राज्यातील प्रमुख प्रश्‍न उचलून धरत नाही.

एका बाजूला शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे नुकसान झाले आहे. महागाईने थैमान घातले आहे. मात्र राज्यातील जनतेचे लक्ष इतरत्र वळविण्यासाठी हे नाटक चालले आहे, अशी टीकाही खासदार शेट्टी यांनी या वेळी बोलताना केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT