Raju Shetty News : ऊसतोडणी सातशे रुपये करावी, ऊसतोडणी मशिन मालकांसाठी लवाद स्थापन करण्यात यावा, आदी मागण्यांसाठी बुधवारी (ता. ५) आझाद मैदानावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी मोर्चेकरांना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghtana) अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मार्गदर्शन केले.
राजू शेट्टी यांनी मोर्चानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, की राज्य आणि केंद्रातील दोन्ही सरकारला कंटाळलो आहे. त्यांच्यावर शेतकऱ्यांचा आणि जनतेचा विश्वास नाही. त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटना येत्या निवडणुका स्वबळावर लढणार आहे.
लोकसभेच्या सहा जागा लढणार असल्याच राजू शेट्टी यांनी या वेळी स्पष्ट केले. ऊसतोडणी कामगारांच्या विविध मागण्यांबाबत सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी राजू शेट्टी यांनी हे आंदोलन केले.
या आंदोलनाला खासदार उदयनराजे भोसले यांचाही पाठिंबा दिला आहे. या मोर्चात ऊस तोडणी मजूर, ऊसतोडणी मशिन मालक सहभागी झाले होते.
या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आम्ही महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडलो आहेत. भाजपमधून या अगोदरच बाजूला झालो आहोत.
शेतकरी, कष्टकरी, व्यापारी, महिला वर्ग, बेरोजगारी, समाजातील विविध प्रश्नांवर सातत्याने संघर्ष चालू आहे. रस्त्यावरची लढाई आमची संपलेली नाही, असे राजू शेट्टी यांनी काही दिवसांपूर्वी पत्रकारांना सांगितले होते.
राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा फटका बसला. हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतल्याने शेतकरी हतबल झाला. अशावेळी सरकार आणि विमा कंपन्यांकडे शेतकरी डोळे लावून बसले आहेत.
मात्र तिकडूनही योग्य मोबदला न मिळाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी केंद्र आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.