MPKV NIRF Rank Agrowon
ताज्या बातम्या

MPKV NIRF Rank : महात्मा फुले कृषी विद्यापीठाला ‘एनआयआरएफ’मध्ये मानांकन

NIRF Rank : क्रमवारीत छत्तीसावे स्थान; राज्यातील एकमेव

Team Agrowon

MPKV Rahuri : सूर्यकांत नेटके ः अॅग्रोवन वृत्तसेवा
नगर ः मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकारकडून २०२३ ची राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांची क्रमवारी (एनआयआरएफ) जाहीर करण्यात आली आहे.

त्यात राहुरी येथील (जि. नगर) महात्मा फुले कृषी विद्यापीठाने देशातील कृषी विद्यापीठांमध्ये ३६ वा क्रमांक प्राप्त केला आहे. तर असे स्थान पटकाविणारे हे राज्यातील एकमेव कृषी विद्यापीठ ठरले आहे.

मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून २०१६ पासून म्हणजे आठ वर्षांपासून देशातील प्रमुख संस्था, विद्यापीठांसह १० वेगवेगळ्या प्रवर्गातील क्रमवारी जाहीर केली जाते. या आराखड्यात देशभरातील संस्थांची क्रमवारी लावण्याची पध्दत आहे.

विविध विद्यापीठे आणि संस्थांच्या क्रमवारीसाठी व्यापक मापदंड ठरविण्यासाठी मानव संसाधन विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्याकडून स्थापन केलेल्या कोअर समितीद्वारे प्राप्त झालेल्या एकूण शिफारशींमधून ही कार्यपद्धती घेण्यात आली आहे.

या क्रमवारीमध्ये शिक्षण, संशोधन, व्यावसायिक पद्धती, पदवी परिणाम आदी निकषांचा समावेश होतो.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रस्ताव सादर करताना विद्यापीठातील पदवी, पदव्युत्तर व आचार्य पदवी, विद्यार्थी संख्या, प्राध्यापक संख्या, विद्यार्थी व प्राध्यापक यांचे गुणोत्तर, कायमस्वरूपी प्राध्यापक, आर्थिक स्रोत व त्यांचा योग्य वापर, प्रसारित संशोधन लेख व त्यांची गुणवत्ता, मंजूर पेटेन्ट्‍स, विद्यापीठ स्तरावरील परीक्षा व त्यांची गुणवत्ता, आचार्य पदवीधारक विद्यार्थी, परराज्यातील व परदेशातील विद्यार्थ्यांची संख्या, मुलींची संख्या, आर्थिकदृष्ट्या मागासलेच्या व अपंग विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा या सर्व बाबींचा अंतर्भाव करण्यात आला होता. या सर्व गुणांच्या निकषांवर या विद्यापीठाला मानांकन देण्यात आले.

मानांकनाच्या प्राप्तीसाठी कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील, माजी अधिष्ठाता डॉ. पी. एन. रसाळ, माजी अधिष्ठाता डॉ. उत्तम चव्हाण, संशोधन संचालक डॉ. सुनिल गोरंटीवार, माजी विस्तार शिक्षण संचालक डॉ. तानाजी नरुटे, अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे, माजी कुलसचिव प्रमोद लहाळे, माजी नियंत्रक डॉ. बापुसाहेब भाकरे, नियंत्रक विजय पाटील, विद्यापीठ अभियंता मिलिंद ढोक आदींसह सर्व कृषी महाविद्यालयांचे सहयोगी अधिष्ठाता यांच्या प्रयत्नांतून विद्यापीठात वेगवेगळे उपक्रम, शेतकऱ्यांसाठी विविध संकल्पना, शेती विकासासाठी अनेक बाबी राहवल्या जात आहेत. त्यास हा बहुमान मिळाल्याची भावना विद्यापीठात व्यक्त केली जात आहे.

क्रमवारीत यंदा प्रथमच कृषी प्रवर्ग
२०२३ या शैक्षणिक वर्षात प्रथमच कृषी प्रवर्गाचा राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत समावेश करण्यात आला आहे. देशातील १५२ कृषी संलग्न संस्थांनी या क्रमवारीसाठी अर्ज केला होता. महात्मा फुले कृषी विद्यापीठाने या क्रमवारीसाठी प्रथमच अर्ज केला होता.

या विद्यापीठाला देशातील पहिल्या ४० कृषी संलग्न संस्थांच्या क्रमवारीत स्थान मिळाले आहे. महाराष्ट्र राज्यातील हे एकमेव कृषी विद्यापीठ आहे, ज्याला राष्ट्रीय शैक्षणिक संस्थांच्या क्रमवारीत मानांकन मिळाले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठात तीन वर्षांत अभिनव उपक्रम राबविले. त्यात पर्यावरण, वातावरणातील बदलाला अनुसरून तंत्रज्ञान, जागतिक बॅंक प्रकल्प, सेंद्रिय शेती, देशी गाई संवर्धन, शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी स्मार्ट रूम, शेतकरी उद्योजक होण्यासाठी प्रयत्न आदींचा समावेश राहिला. त्याचा परिणाम म्हणून हा बहुमान मिळाला.
- डॉ. प्रशांतकुमार पाटील, कुलगुरू, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी, जि. नगर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT