Baramati Agrowon
ताज्या बातम्या

Baramati News : योजनांचा गतीने लाभ देऊन ‘महाराजस्व अभियान’ यशस्वी

बारामती तालुक्यात कमी कालावधीत सर्वांत जास्त फेरफारीच्या नोंदी निकाली काढण्यात आल्या असून, त्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले आहे.

Team Agrowon

Baramati News : सर्व विभागांनी ‘महाराजस्व’ अभियान यशस्वीपणे राबवून लाभार्थ्यांना विविध योजना व सेवांचा लाभ गतीने आणि विहित कालमर्यादेत पुरवावा, असे आवाहन प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे (Dadasaheb Kamble) यांनी केले.

उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालय व अन्य सर्व शासकीय कार्यालयांच्या संयुक्त विद्यमाने ‘महाराजस्व’ अभियान शिबिराचे आयोजन बारामतीतील जिजाऊ मंगल कार्यालयात मंगळवारी (ता. ७) करण्यात आले होते.

या शिबिराच्या उद्‌घाटनप्रसंगी प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे बोलत होते. कार्यक्रमास तहसीलदार विजय पाटील, परिविक्षाधीन तहसीलदार नेहा शिंदे, निवासी नायब तहसीलदार विलास करे, नायब तहसीलदार डॉ. भक्ती सरोदे-देवकाते, उप मुख्याधिकारी पद्‌मश्री दाइंगडे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, सहायक मोटार वाहन निरीक्षक प्रियांका सस्ते, परिविक्षाधीन-नायब तहसीलदार तुषार गुजवटे आदि उपस्थित होते.

श्री. कांबळे म्हणाले, की नागरिकांना विविध विभागांतील योजनांचे लाभ एकाच ठिकाणी मिळावेत यासाठी तालुका स्तरावर लोकाभिमुख महाराजस्व अभियानांतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध विभागांचे स्टॉल्स लावण्यात आले आहेत.

जिल्ह्यामध्ये बारामती तालुक्यात कमी कालावधीत सर्वांत जास्त फेरफारीच्या नोंदी निकाली काढण्यात आल्या असून, त्याबद्दल जिल्हाधिकारी यांनी महसूल प्रशासनाचे कौतुक केले आहे.

तहसीलदार विजय पाटील म्हणाले, की प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम, गतिमान व पारदर्शक होण्यासाठी तालुकास्तरावर महाराजस्व अभियान राबविण्याच्या सूचना शासनाने दिल्या आहेत. हे अभियान ३० एप्रिलपर्यंत राबविण्यात येणार आहे.

शासकीय विभागाकडून दिले जाणारे परवाने, दाखले, प्रमाणपत्रे आदींसह गावातील रस्ते, वहिवाटीचे कामे, फेरफार नोंदी निकाली काढणे, अतिक्रमण काढणे, अकृषिक परवाना आदी प्रलंबित असलेल्या कामांचा निपटाराही या अभियानाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.

अभियानांतर्गत असे दिले लाभ...

महाराजस्व अभियानांतर्गत २६ जानेवारीपासून ५५८ शिधापत्रिका, ३९२ लाभार्थ्यांना संजय गांधी निराधार योजना अनुदान पत्र, १० लाभार्थ्यांना नैसर्गिक आपत्ती योजनेअंतर्गत ४१ हजार रुपयांचे अनुदान वाटपाचे पत्र, २ भोगवटा सनद, उप प्रादेशिक परिवहन कार्यालयातर्फे १३८ नूतनीकरण परवाना, ८६८ शिकाऊ परवाना

कृषी विभागामार्फत कृषी यांत्रिकीकरण उप अभियान सन २०२२-२३ अंतर्गत २ ट्रॅक्टर, १ मेकॅनिकल रिव्हर्सिबल सिंगल पल्टी नांगर, १ रोटाव्हेटर, पंचायत समिती कडून ९३-३ एचपी पाणबुडी मोटार, ७६- ५ एचपी पाणबुडी मोटार, ३६ सरी रिझट

८१ ताडपत्री, २२ क्रेट्‌स, ६० बॅटरी पंप, बारामती नगर परिषद मार्फत ३६८ लाभार्थ्यांना पंतप्रधान स्वनिधी प्रमाणपत्र व उप अधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाकडून १५५ मोजणीचे नकाशे वाटप इत्यादींचे वितरण करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Paddy Crop Loss: पावसामुळे भातपीक संकटात

Bidri Karkhana Sugarcane Price: 'बिद्री'च्या ऊसदराची उत्सुकता संपली! यंदाही उच्चांकी दर जाहीर

Sugar Factory: साखर कारखाना वरदान ठरला; बिराजदार

Agrowon Podcast: कांदा दरात काहीसे चढउतार, सोयाबीनचे दर स्थिर, कापूस दबावातच, गवारचे दर तेजीतच तर बाजरी नरमली

Soybean Price: सोयाबीन दर दहा वर्षांपासून ‘जैसे थे’

SCROLL FOR NEXT