Green Energy Agrowon
ताज्या बातम्या

Green Energy : मध्यप्रदेश सरकारचे २० हजार मेगावॉट हरित ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट

मध्य प्रदेशने २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे अतिरिक्त २० हजार मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे,

टीम ॲग्रोवन

भोपाळ (पीटीआय) ः मध्य प्रदेशने २०३० पर्यंत अक्षय ऊर्जा स्त्रोतांद्वारे (Source Of Renewable Energy) अतिरिक्त २० हजार मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे (Green Energy) महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे, असे मध्य प्रदेश ऊर्जा आणि अक्षय ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव संजय दुबे यांनी सांगितले.

दुबे म्हणाले, ‘‘याशिवाय, येत्या तीन-चार वर्षांत सरकारने १,५०० मेगावॉट क्षमतेचा आगर-शाजापूर-नीमच सोलर पार्क, ६०० मेगावॉटचा ओंकारेश्वर फ्लोटिंग सोलर पॉवर प्लांट स्थापन करून १० हजार मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीचे उद्दिष्ट ठेवले आहे. ७५० मेगावॉट हायब्रीड प्रकल्प, ९५० मेगावॉट हायब्रीड स्टोरेज छतरपूर प्रकल्प, ५०० मेगावॉट कुसुम-ए आणि १,२५० मेगावॉट कुसुम-सी प्रकल्प राबविण्यात येतील.’’

‘‘कुसुम योजनेंतर्गत २-३ मेगावॉट हरित ऊर्जा निर्मितीसाठी शेतकरी आणि इतरांद्वारे लहान अक्षय ऊर्जा प्रकल्प उभारले जात आहेत. हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरेल. राज्य सरकार मुरैना जिल्ह्यातील चंबळ प्रदेशात १,४०० मेगावॉटचा सौर ऊर्जा प्रकल्पही उभारत आहे,’’ असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

दुबे म्हणाले, ‘‘सरकार विस्तीर्ण चंबळच्या खोऱ्यांमध्ये सौर ऊर्जा प्रकल्प स्थापन करण्याचा विचार करत आहे. ओंकारेश्वर सौरऊर्जा प्रकल्प हा मध्य प्रदेशातील पहिला, भारतातील सर्वात मोठा आणि जगातील सर्वात मोठा तरंगणारा सौर ऊर्जा प्रकल्प आहे. पहिल्या टप्प्यांतर्गत २७८ मेगावॉट वीज निर्मिती केली जाईल, ज्यासाठी नुकताच सामंजस्य करार करण्यात आला. हा प्रकल्प ‘अल्ट्रा मेगा रिन्युएबल एनर्जी पॉवर पार्क्स स्कीम (UMREPP) अंतर्गत राबविण्यात येत आहे.’’

‘‘या प्रकल्पामुळे मध्य प्रदेशातील लोकांना अनेक फायदे मिळतील. ऊर्जेची मागणी पूर्ण करण्यासाठी सुमारे १२ लाख टन कार्बन उत्सर्जन कमी करणे, सुमारे १२०० हेक्टर मौल्यवान जमिनीची बचत करणे हे उद्दिष्ट आहे. जमिनीवर बसवलेल्या सौर प्रकल्पांमध्ये सौर पॅनेल स्वच्छ करण्यासाठी भूगर्भातील पाण्याचा वापर केला जातो. तथापि, तरंगत्या सौर प्रकल्पात जलाशयातील पाणी साफसफाईसाठी वापरले जाईल, जे पुन्हा जलाशयात जाईल. त्यामुळे मौल्यवान भूजल वाचवण्याव्यतिरिक्त पाण्याची हानी होणार नाही,’’ असे या अधिकाऱ्याने स्पष्ट केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Production Policy: चारा उत्पादन धोरण राबवविणार: राधाकृष्ण विखे पाटील

CM Samruddha Panchayat Raj: मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाची पडताळणी सुरू

NAFED Kharedi: नाफेडच्या खरेदी बंदमुळे हरभरा उत्पादक अडचणीत

Crop Insurance: पीकविमा भरपाईसाठी ‘हाहाकार मोर्चा’

Fake Seeds: बियाणे, खते, कीटकनाशकांचे ११८ नमुने अप्रमाणित

SCROLL FOR NEXT