Rain Update Agrowon
ताज्या बातम्या

Rain Update : रत्नागिरी जिल्ह्यात सलग दोन दिवस हलक्या सरी

Latest Rain News : सलग दोन दिवस जिल्ह्यात पडलेल्या हलक्या सरींनी बळीराजाला दिलासा मिळाला आहे.

Team Agrowon

Rtanagiri News : सलग दोन दिवस जिल्ह्यात पडलेल्या हलक्या सरींनी बळीराजाला दिलासा मिळाला आहे. बिघडलेल्या वातावरणामुळे सहाशे हेक्टरवर कीड-रोगांचा सौम्य प्रादुर्भाव आढळून आला होता. पावसामुळे यावर नियंत्रण येईल, असे असे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

शनिवारी (ता. २६) सकाळी ८.३० वाजेपर्यंतच्या चोवीस तासांत जिल्ह्यात सरासरी २९.३३३ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड ४२, दापोली ४१, खेड १०, गुहागर ४८, चिपळूण ५१, संगमेश्‍वर २०, रत्नागिरी ६, लांजा १६, राजापूर ३० मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात १ जूनपासून आतापर्यंत २४८५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षी याच कालावधीत २९५८ मिमीची नोंद झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा चारशे मिमीचा फरक आहे.

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने विश्रांती घेतली. या सरींमुळे भेगा पडलेल्या भातशेतीला दिलासा मिळत आहे. काही ठिकाणी पाण्याअभावी रोपे पिवळी पडली होती. करप्यासह पाने गुंडाळणारी अळी ठिकठिकाणी होती. भात लावण्या झाल्यानंतर पाणी कमी पडल्यामुळे आवश्यक ताण भाताला मिळालेला नाही.

त्यामुळे रोपांची वाढही खुंटलेली आहे. जिल्ह्यात ६७ हजार हेक्टरवर भात लागवड करण्यात आली आहे. त्यातील सुमारे एक टक्क्याहून अधिक क्षेत्रावर रोगांचा प्रादुर्भाव झाल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले. गुरुवारपासून (ता. २४) जिल्ह्यात हलक्या सरींना सुरुवात झाली.

शुक्रवारी (ता. २५) दुपारी पंधरा मिनिटांहून अधिक काळ पाऊस झाला. पण ऊन पडून गेल्यामुळे साचलेले पाणी जमिनीत मुरले आहे. लावणी झाल्यानंतर पुरेसे पाणी मिळालेले नाही. अनेक ठिकाणी रोपांना फुटवा आलेला नाही.
- सुहास लिंगायत, शेतकरी
पाऊस पुरेसा नसल्याने भातपिकांवर रोग पसरले होते. मात्र सलग दोन दिवस पडत असलेल्या सरींमुळे करप्यापासून भातशेतीचा धोका टळेल.
- सुनंदा कऱ्हाडे, जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील अपात्र लाभार्थ्यांवर सरकारची कारवाई; अनुदानाची वसुली, तुरुंगवासाचीही शक्यता?

Skill Training Centre: मराठवाड्यात सुरू होणार अत्याधुनिक कौशल्य प्रशिक्षण केंद्र

Bio Tech Farming : ‘के. बी. बायो’च्या वनस्पतिजन्य पीक संरक्षण तंत्रज्ञानाला मान्यता

Land Records Update: जमीन मालकी कायद्याची सिंधुदुर्गातून अंमलबजावणी

Khandesh Rain Update: खानदेशात पावसाची विश्रांती

SCROLL FOR NEXT