Rain Agrowon
ताज्या बातम्या

Marathwada Rain : मराठवाड्यातील पाच जिल्ह्यात सर्वदूर हलका, मध्यम ते दमदार पाऊस

Marathwada Monsoon Update : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यात बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतचे २४ तासात पावसाची हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar News : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव व लातूर या पाच जिल्ह्यात बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंतचे २४ तासात पावसाची हलकी, मध्यम ते दमदार हजेरी लागली. जालना, बीड व धाराशिव या तीन जिल्ह्यातील सहा मंडळात अतिवृष्टी झाली. धाराशिव जिल्ह्यात पावसाचा जोर सर्वाधिक होता.

पाचही जिल्ह्यातील २९ तालुक्यात सरासरी २० ते ५४ मिलिमीटर दरम्यान पाऊस झाला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड, खुलताबाद, फुलंब्री, सिल्लोड, सोयगाव, तालुक्यात मध्यम पाऊस झाला.

जालना जिल्ह्यातील अंबड, तालुक्यात मध्यम तर भोकरदन, जाफराबाद, जालना, बदनापूर, घनसावंगी, मंठा या तालुक्यांमध्ये मध्यम ते दमदार पाऊस झाला. बीड जिल्ह्यातील वडवणी तालुका वगळता बीड, पाटोदा, आष्टी, गेवराई, माजलगाव, अंबाजोगाई, केज, परळी, धारूर, शिरूर कासार आदी तालुक्यातील सर्व मंडळांमध्ये मध्यम ते दमदार पाऊस झाला.

लातूर जिल्ह्यातील देवणी, शिरूरअनंतमाळ तालुक्यात हलका ते मध्यम तर लातूर, औसा, अहमदपूर, निलंगा, उदगीर, चाकूर, रेणापूर, जळकोट आदी तालुक्यात मध्यम ते दमदार पावसाची हजेरी लागली.

धाराशिव जिल्ह्यातील धाराशिव, कळंब, तालुक्यात मध्यम ते दमदार तर तुळजापूर, परांडा, भूम, उमरगा, लोहारा, वाशी आदी तालुक्यात दमदार ते जोरदार पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील तुळजापूर भूम, उमरगा, लोहारा, वाशी आदी तालुक्यात ४० ते ५४ मिलिमीटर दरम्यान सरासरी पाऊस झाला.

जिल्हानिहाय अतिवृष्टीची मंडळ (पाऊस मिलिमीटरमध्ये)

जालना : विरेगाव ६९.७५, बीड : कडा ६५.२५, धाराशिव : नळदुर्ग ६९, वालवड ६७.७५, डाळिंब ७२.७५, जेवळी ७२.७५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

First T2T Genome of Pigeonpea : देशातील पहिला 'टी2टी' जीनोम विकसित; तूर उत्पादन वाढीसाठी होणार फायदा

Sugarcane Crop Damage: अतिवृष्टिबाधित लोळलेल्या उसाचे नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना

Artificial Groundwater Recharge: कृत्रिम भूजल पुनर्भरणाचे तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT