Nanded Rain Agrowon
ताज्या बातम्या

Nanded Rain Update : नांदेडमध्ये सर्वत्र कमी अधिक पाऊस

Latest Rain Update : शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासात गुरुवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १९.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

Team Agrowon

Nanded News : शहर आणि जिल्ह्यात गेल्या २४ तासात गुरुवारी (ता. १३) सकाळी आठ वाजेपर्यंत सरासरी १९.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. कमी अधिक प्रमाणात सर्वत्र पाऊस झाला. काही ठिकाणी दिवसभर रिमझिम पाऊस झाला. त्यामुळे पिकांना जीवदान मिळाले आहे. नांदेड शहरात पावसाचे प्रमाण कमी होते मात्र जिल्ह्यातील अनेक भागात चांगला पाऊस झाला.

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १९.७० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. माहूर तालुक्यातील सिंदखेड आणि वानोळा या दोन मंडलांत अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे. सिंदखेडला ७०.२५ तर वानोळ्यात ७९.२५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. चोवीस तासातील सरासरी १९.७० मिलिमीटर असून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६०.४० मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १८ टक्के पाऊस झाला आहे.

यंदाच्या वर्षी जून महिन्यात पाऊस झाला नसल्याने खरीपाच्या पेरण्या खोळंबल्या होत्या. जुलै महिन्यात पहिल्या आठवड्यात पावसाला सुरवात झाली. काही भागात बरा पाऊस झाला.

गेल्या दोन चार दिवसांपासून ढगाळ हवामान आणि कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात बदल झाला असून बऱ्यापैकी शेत जमिनीत ओलावा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई सुरू केली आहे.

जिल्ह्यात आत्तापर्यंत चार लाख ६१ हजार ६१२ हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात सर्वाधीक दोन लाख ६६ हजार हेक्टरवर सोयाबीन तर एक लाख ४१ हेक्टरवर कपाशीची लागवड झाली आहे.

तालुकानिहाय २४ तासात झालेला पाऊस (मिलिमीटरमध्ये)

नांदेड ः ०.७०, बिलोली ः २०.६०, मुखेड ः २७.४०, कंधार ः ९.१०, लोहा ः ३.५०, हदगाव ः २०.१०, भोकर ः ०६.७०, देगलूर ः ३७.८०, किनवट ः ३४.४०, मुदखेड ः ०२.५०, हिमायतनगर ः २०, माहूर ः ७१.९०, धर्माबाद ः ३३.२०, उमरी ः आठ, अर्धापूर ः ५.१०, नायगाव ः नऊ मिलिमीटर. चोवीस तासातील सरासरी १९.७० मिलिमीटर असून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी १६०.४० मिलिमीटर म्हणजेच वार्षिक सरासरीच्या १८ टक्के पाऊस झाला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

LPG Cylinder Supply Issue: ‘उज्ज्वला’च्या डोईवर पुन्हा सरपण

Tur Farming: तूर लागवडीसाठी निवडा योग्य वाण

Farmer Conflict Resolution: अडीच महिन्यात मिटवली ६६३ बांधांची भांडणं

Brazil Cooperative Model: ब्राझीलमधील सहकारी संस्थांची व्यावसायिकता

Farmers Protest: धनगाव येथे कर्जमाफी आदेशाची होळी

SCROLL FOR NEXT