Pune Rain Update : पावसाचा जोर ओसरला

Pune Monsoon Update : दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणांतील पाण्याच्या आवकेत घट झाली आहे.
Rain
RainAgrowon
Published on
Updated on

Pune Rain News : दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला आहे. धरणांतील पाण्याच्या आवकेत घट झाली आहे. गुरुवारी (ता.१३) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या २४ तासांमध्ये धरणांत ०.९३ टीएमसी एवढ्या पाण्याची आवक झाली आहे. येत्या काळात पाऊस न झाल्यास या पाण्यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे.

सध्या ढगाळ वातावरण आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी बरसत आहेत. पश्चिमेकडील ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा, कुंडली या घाटमाथ्यावरही जोर ओसरला आहे. पावसाचा शिडकावा झाला आहे. मुठा खोरे, नीरा खोरे आणि कुकडी खोऱ्यातील धरणक्षेत्रात पावसाने चांगलीच उघडीप दिली आहे.

Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर पाऊस

त्यामुळे धरणांतील आवकेत चांगलीच घट झाली आहे. गेल्या आठवड्यापर्यंत धरणांतील पाण्यामध्ये एक ते दीड टीएमसीपर्यंत पाण्याची आवक होत होती. परंतु पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. त्यानंतर धरणांत टप्याटप्याने चांगलीच आवक कमी झाली आहे.

Rain
Pune Rain Update : पुणे जिल्ह्याच्या पूर्व भागात मध्यम पावसाची हजेरी

मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव, पानशेत, खडकवासला या धरणक्षेत्रात तुरळक सरी पडल्या. नीरा खोऱ्यातील पवना, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, भाटघर, नीरा देवघर या धरणक्षेत्रातही हलका पाऊस पडला. कासारसाई, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, वीर या धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण आहे.

नीरा खोऱ्यात ९.७० टीएमसी आवक

कुकडी खोऱ्यातील पिंपळगाव जोगे, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड, विसापूर, उजनी या सर्वच धरणक्षेत्रात ढगाळ वातावरण आहे. मुठा खोऱ्यामध्ये ५.३२ टीएमसी, नीरा खोऱ्यात ९.७० टीएमसी, कुकडी खोऱ्यामध्ये २.७७ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com