Leopard terror  Agrowon
ताज्या बातम्या

Leopard Terror : शारदानगर, माळेगाव परिसरात बिबट्याचा वावर

Baramati News :बारामती तालुक्यातील शारदानगर, माळेगाव, मेडद या गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे.

Team Agrowon

Baramati News : बारामती तालुक्यातील शारदानगर, माळेगाव, मेडद या गावांच्या परिसरात बिबट्याचा वावर दिसून आला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. अन्न व निवाऱ्याच्या शोधात एक बिबट्या शुक्रवारी (ता. २२) शारदानगर येथील देवकातेनगर, पवारवस्ती परिसरात दिसून आला.

शुक्रवारी पहाटेच्यावेळी किरण पवार यांच्या शिवारात या बिबट्याचे वास्तव्य दिसून आले. नीरा डावा कालव्यालगतच्या रस्त्याने ये-जा करणाऱ्या प्रवाशांनी मोबाईलद्वारे बिबट्याच्या वास्तव्याचे चित्रीकरण केले व ते सोशल मीडियाद्वारे व्हायरल केले. परिणामी गावकऱ्यांमध्ये कमालीची घबराट पसरली आहे.

पोलिस व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळाची पाहणी सुरू केली आहे. तसेच, संबंधित बिबट्या पकडण्यासाठी वन खात्याने उपाययोजना सुरू केल्या आहेत. याशिवाय वन खात्याने गावकऱ्यांना बिबट्याच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी मार्गदर्शन केले आहे, अशी माहिती वनपाल हेमंत मोरे यांनी दिली.

दरम्यान, मेडद भागात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन शेळ्या ठार झाल्या आहेत. या घटनेचा पंचनामा बारामतीचे वन परिक्षेत्र अधिकारी शुभांगी लोणकर यांच्या मार्गदर्शनाखाली झाला आहे.

तसेच, पशुधन हल्ल्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासकीय आर्थिक मदत मिळण्यासाठी प्रतिशेळी २० हजार रुपयांप्रमाणे प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयात पाठविले आले आहेत, अशी माहिती वनपाल पाचपुते यांनी दिली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soil Health Management: जमीन सुपोषण ही काळाची गरज : डॉ. इंद्र मणी

Farming Tips: कोरडवाहू शेतात दीर्घकाळ ओलावा टिकवण्यासाठी विविध पद्धती

Youth Congress Protest: मुदखेडमध्ये युवक काँग्रेसचा गाढव मोर्चा

Farm Loan Waiver: ३२ लाख शेतकऱ्यांची फसवणूक, त्यांची ५० हजारांवर बोळवणूक, कर्जमाफीवरून अजित नवलेंचा गंभीर आरोप

Onion Farmer Protest: कांदा उत्पादकांना न्याय मिळेपर्यंत संघर्ष करणार : हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT