Leopard Attack : मानव-बिबट संघर्ष टाळण्यासाठी सतर्कता बाळगावी

Human Leopard Conflict : दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे अस्तित्व आढळून आले आहे. परिणामी, मानव-बिबट संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे.
Leopard Attack
Leopard AttackAgrowon

Pune News : दौंड तालुक्यातील अनेक भागांत बिबट्याचे अस्तित्व आढळून आले आहे. परिणामी, मानव-बिबट संघर्ष निर्माण होण्याची परिस्थिती झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षतेच्या दृष्टीने सतर्क राहावे, असे आवाहन तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी कल्याणी गोडसे यांनी केले आहे.

तालुक्यात दौंड, वरवंड व यवत अशी वनपरिमंडळे आहेत. यामध्ये वरवंड व यवत वनपरिमंडळ कार्यक्षेत्रात बिबट्याचे वाढते अस्तित्व सर्वांची डोकेदुखी बनली आहे. तसेच दौंड वनपरिमंडळ हद्दीतही बिबट्या आढळून आला.

Leopard Attack
Leopard Attack : घरात घुसून बिबट्याने हल्ला केलेल्या व्यक्तीचा मृत्यू

वरवंड परिमंडळ हद्दीतील नानगाव येथे बिबट्याच्या हल्ल्यात ज्येष्ठ नागरिक जखमी झाल्याची नुकतीच घटना घडली आहे. बिबट्यांची वाढती संख्या व वाढता वावर तसेच पाळीव जनावरांवरचे वाढते हल्ले यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Leopard Attack
Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात मजूर गंभीर जखमी

या पार्श्‍वभूमीवर मानव व बिबट संघर्ष टाळण्यासाठी तालुका वनपरिक्षेत्र अधिकारी गोडसे यांनी वनअधिकारी व कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून तालुक्यात आवश्यक ठिकाणी जनजागृती मोहीम सुरू केली आहे. नानगाव, राजेगाव, शिरापूर, स्वामीचिंचोली आदी ठिकाणी जनजागृती करण्यात आली.

संघर्ष टाळण्यासाठी काय करावे...

- रात्रीच्या वेळी बिबट्या जास्त सक्रिय असल्याने एकट्याने बाहेर पडू नये.

- शेतकऱ्यांनी पाळीव जनावरांना सुरक्षित ठिकाणी बांधावे.

- नागरिकांनी रात्रीच्या वेळी घराचे दरवाजे व्यवस्थित बंद करावे.

- शेत शिवारात वृद्ध व लहान मुलांना एकटे सोडू नका.

- शेतात जाताना किंवा रात्री एकटे फिरताना हातात बॅटरी व काठी बाळगावी.

- घराच्या जवळ ऊस किंवा इतर पिके करू नका.

- घराच्या समोर आजूबाजूला विजेचा प्रकाश ठेवा.

- बिबट्या दिसल्यास शांत राहा, त्याला डिवचण्याचा प्रयत्न करू नका, त्याच्या मार्गाने जाऊ द्या.

- रात्रीच्या वेळी अंगणात झोपू नका.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com