Land Acquisition Agrowon
ताज्या बातम्या

Land Acquisition : सुरत-चेन्नई महामार्गासाठीची वैरागमधील जमीन मोजणी पूर्ण

Surat Chennai Highway : सुरत-चेन्नई महामार्गामधील ट्रम्पेट अंतर्गत बार्शी येथील वैराग गावातील मोजणी प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून म्हणजे आजतागायत सात वेळा प्रयत्न करूनही प्रलंबित होती.

Team Agrowon

Solapur News : सुरत-चेन्नई महामार्गामधील ट्रम्पेट अंतर्गत बार्शी येथील वैराग गावातील मोजणी प्रक्रिया गेल्या सहा महिन्यांपासून म्हणजे आजतागायत सात वेळा प्रयत्न करूनही प्रलंबित होती. वैराग येथील नगरपंचायत प्रमाणे जमिनीस दर मिळावा, अन्यथा मोजणीच होऊ देणार नाही, अशी येथील शेतकऱ्यांची मागणी होती.

याबाबत शेतकऱ्यांनी आमदार राजेंद्र राऊत यांना भेटून बाजू मांडली होती. नगरपंचायत प्रमाणे चौरस मीटर दर मिळविण्यासाठी आमदार राऊत यांनी मागील आठवड्यात जिल्हाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेतली होती.

तरी देखील शेतकऱ्यांनी याबाबत पाठपुरावा करण्यासाठी वेळ मिळावा म्हणून मोजणीस विरोध केली होता. मात्र सात ऑक्टोबरपूर्वी मोजणी पूर्ण न झाल्यास संपूर्ण प्रकल्पाचे नुकसान होईल, ही बाब लक्षात घेऊन आशीर्वाद यांनी प्रत्यक्ष संबंधित शेतकऱ्यांना भेटून वैयक्तिक सुसंवाद साधला.

नगरपंचायतीप्रमाणे चौरस मीटरप्रमाणे दर मिळविण्यासाठी मी स्वत: लक्ष घालून पाठपुरावा करून घेईन, असे आश्‍वासन जिल्हाधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना देऊन त्यांना विश्‍वासात घेतले.

वैराग येथे मोठ्या प्रमाणात विरोध झाल्यास नियमानुसार पोलिस बंदोबस्तात मोजणी करण्याचे अधिकार असतानाही जिल्हाधिकाऱ्यांनी सुसंवादाने शेतकऱ्यांची मने जिंकून परिस्थिती हाताळली व वैराग येथील मोजणी पूर्ण करून घेतली.

यारूपाने सुरत–चेन्नई महामार्ग अंतर्गत येणाऱ्या ग्रीनफिल्ड, रिंग रोड व ट्रम्पेट अशा तिन्ही विभागांची एकूण ५८ गावांची संपूर्ण मोजणी प्रक्रिया झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT