Koyna Dam agrowon
ताज्या बातम्या

Koyna Dam Satara : कोयनेतून १ हजार ५० क्‍युसेक पाण्‍याचा विसर्ग, धरण ५० टक्के भरले

Koyna Dam Water Level Update : कोयना धरण परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे.

sandeep Shirguppe

Koyna Dam News : कोयना धरण परिसरात दमदार पाऊस सुरू असल्याने धरणाच्या शिवसागर जलाशयातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. दरम्यान मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने जवळपास १० ते १२ टीएमसी पाणीसाठा वाढल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

काल (ता.२४) सायंकाळी पाच वाजता धरणातील पाणीसाठा ५३.६९ टीएमसी इतका झाला होता. हे धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अजूनही ५१.५६ टीएमसी पाण्याची गरज आहे.

सातारा जिल्ह्यात होत असलेल्या पावसाने मागच्या २४ तासांत धरणात तब्बल ५.१८ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे. १ जून ते १५ जुलैपर्यंतच्या ४५ दिवसांत धरणात केवळ १५.३० टीएमसी पाण्याची आवक झाली होती. मात्र, त्यानंतर केवळ नऊ दिवसांतच धरणात तब्बल ४३.६२ टीएमसी पाण्याची आवक झाली आहे.

धरणातील मृतसाठा धरून एकून ५३.६९ टीएमसी पाणीसाठ्याची नोंद करण्यात आली. तर धरणात प्रतिसेकंद ५९ हजार ९७७ क्यूसेक पाण्याची आवक सुरू होती. धरणाच्या पायथा वीजगृहातील २० मेगावॅट क्षमतेचे एक जनित्र सुरू करून वीजनिर्मितीनंतर कोयना नदीत प्रतिसेकंद १ हजार ५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

धरण पाणलोट क्षेत्रात गत आठ-दहा दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे. यामुळे पाणीसाठ्यात दररोज सरासरी तीन चार टीएमसीने वाढ होत आहे. १०५.२५ टीएमसी साठवण क्षमता असलेल्या कोयना धरण सध्या पन्नास टक्के भरले आहे. पावसाचे प्रमाण वाढत असल्याने कोयना सिंचन विभागाने दि १ जुलैला कोयना नदीतील बंद केलेला पाण्याचा विसर्ग चोवीस दिवसानंतर पुन्हा सुरू केला आहे.

महाबळेश्‍‍वरबरोबरच सातारा तालुक्‍यात २३.५ मिलिमीटर, जावळीत ४४.०, पाटणमध्‍ये ६६.३, कऱ्हाड- २०.२, कोरेगाव- ८.६, खटाव- ६.९, माण- ६.१, फलटण- १.२, खंडाळा- ६.२, वाई-१९.३ मिलिमीटर इतक्‍या पावसाची नोंद झाली आहे.

जिल्ह्यातील मोठे, मध्‍यम प्रकल्‍पांतर्गत येणाऱ्या धरणांमध्ये एकूण ७२.१९ अब्ज घनफूट पाणीसाठा असून, धरणांमधील पाणीसाठा एकूण क्षमतेच्या ४८.४९ टक्के इतका असल्याची माहिती कृष्‍णा सिंचन विभागाचे उपकार्यकारी अभियंता यांच्‍या कार्यालयाच्‍या वतीने देण्‍यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT