Koyna Dam : महाराष्ट्राची 'भाग्यलक्ष्मी' कोयना धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ

Koyna Dam News : पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाच्या असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर गेला आहे.
Koyna Dam News
Koyna Dam Newsagrowon
Published on
Updated on

Satara News : मागच्या दोन दिवसांपासून होत असलेल्या पावसाने कोयना धरण क्षेत्राची पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. दरम्यान हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार सातारा जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने पुढचे दोन दिवस पावसाचा जोर राहणार आहे. याचबरोबर पश्चिम महाराष्ट्रासाठी महत्वाच्या असलेल्या कोयना धरणाचा पाणीसाठा आता ५० टक्क्यांवर गेला आहे.

मागच्या ८ दिवसांत तब्बल १० ते १२ टीएमसी पाणीसाठा वाढल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे. पाणी पातळीत वाढ होत असल्याने कृष्णा नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याचबरोबर वाड्यावस्त्यांवर असलेल्या गावकऱ्यांना स्थलांतर होण्यास प्रशासनाकडून सूचना करण्यात आल्या आहेत.

कोयना धरण परिसरात मागच्या २४ तासांपासून संततधार सूरू असल्याने पावसाने साडेचार टीएमसी पाणीसाठा वाढला आहे. एकूण धरणाच्या पाणीसाठा ५३ टीएमसीच्या आसपास गेला आहे.

जोरदार पावसामुळे नदी, नाले दुथडी भरून वाहू लागले आहेत. गेल्या २४ तासांत कोयनानगर येथे १४५ मिलिमीटर, नवजाला येथे १८९ मिलिमीटर आणि महाबळेश्वरला १७६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दरम्यान एक आठवड्यात मुसळधार पावसाने धरणातील आवक व पाणीसाठ्यात विक्रमी वाढ झाली आहे. १७ जुलै रोजी धरणातील पाणीसाठा २५.८९ टीएमसी इतका होता. तोच पाणीसाठा आज २६ टीएमसीने वाढला आहे. यामुळे कोयनेचा पाणीसाठी ५१ टीएमसीच्या पुढे गेला आहे. दरम्यान कोयना परिसरात एक आठवड्यात ९९३ मि.मी. नवजा १२१३ व महाबळेश्वर येथे १२७५ मिलीमीटर पावसाची नोंद झाली.

Koyna Dam News
Koyna Dam Satara : कोयना धरण भरण्यासाठी अद्यापही ६६ टीएमसी पाण्याची आवश्यकता

कास धरण भरले

सातारा शहरास पाणीपुरवठा करणारे कास धरण १०० टक्के भरल्याने सातारकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान धरणाची उंची वाढवण्यात आल्यानंतर पहिल्याच वर्षी ०.५ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण भरल्यामुळे सातारकरांनी समाधान व्यक्त केले.

कास धरणातून सातारा शहराला पाण्याचा पुरवठा केला जातो यामुळे सातारा नगरपरिषदेने यंदा धरण वाढवण्याचे काम केले आहे. अशातच पावसाने उशिरा सुरूवात केली. त्यामुळे कास धरण पाणलोट क्षेत्रातही फारसा पाऊस नव्हता. त्यामुळे धरण पाणी पातळी वाढण्यास उशिर होत होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com