Almatti Koyna Dam Level agrowon
ताज्या बातम्या

Almatti Koyna Dam Level : कोल्हापूर, सांगलीला महापुराचा फटका बसणार का ? कोयना, चांदोली आणि अलमट्टी धरणांच्या पाणीपातळीत वाढ

Koyna Dam : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापुराची स्थिती कोयना, चांदोली आणि अलमट्टी धरणाच्या पाणी विसर्गावर अवलंबून असते.

sandeep Shirguppe

Almatti Dam Water Level : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात महापुराची स्थिती कोयना, चांदोली आणि अलमट्टी धरणाच्या पाणी विसर्गावर अवलंबून असते. यामूळे सध्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूर स्थिती नसली तरी पुढच्या दोन दिवसांत अतिवृष्टी झाल्यास परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे.

दरम्यान कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर पाऊस होत असल्यामूळे धरण पाणीसाठ्यात आवक वाढली आहे. त्यामूळे आजपासून (ता.२७) विसर्ग दुप्पट केला जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली आहे.

अलमट्टी पाटबंधारे विभागाकडून दिशाभूल?

अलमट्टी धरणातून १ लाख ५० हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग केला जात असल्याची माहिती कर्नाटक पाटबंधारे विभागाकडून देण्यात येत आहे. परंतू अलमट्टी धरणाच्या अधिकृत वेबसाईटवर ८५ हजार ८५७ क्युसेक्सने आऊट फ्लो होत असल्याची माहिती आहे. तर अलमट्टी धरणात इन फ्लो हा जवळपास १ लाख ६१ हजार असल्याची माहिती आहे. यामुळे वेबसाईटवर गोंधळ आहे की कर्नाटक पाटबंधारे दिशाभूल करत आहे याबाबत तर्क वितर्क लढवले जात आहेत.

सांगली जिल्ह्यातील आयर्विन पूल आणि कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्यावरील पाणी पातळी किंचीत कमी, जास्त होत आहे. दरम्यान पूढच्या दोन दिवसांत कोयना आणि वारणा धरण क्षेत्रात अतिवृष्टी झाल्यास या दोन्ही धरणांतून पाण्याचा विसर्ग वाढू शकतो यामुळे पूरस्थिती निर्माण होण्याची भिती आहे.

सध्या कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणातील स्वयंचलीत दरवाज्यातून ७११२ क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तर सांगली जिल्ह्यातील चांदोली धरणातून ६ हजार ७८० क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू आहे. सध्या कोयना नदीमध्ये १०५० क्यूसेक विसर्ग सुरू आहे. तो आता २ हजार १०० करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाच्या वतीने देण्यात आली.

केव्हा महापूर येतो

कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधाऱ्याच्या पाणी पातळीवर कोल्हापूर शहराला महापुराचा फटका बसणार का हे ठरवले जाते. तर सांगली जिल्ह्यातील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीवर दोन्ही जिल्ह्यातील गावांना पुराचा किती फटका बसतो याचा नेमका अंदाज लावला जातो. कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ, हातकणंगले, करवीर तीन तालुक्यांना पंचगंगा नदीच्या पाण्याच्या दाबाचा फटका बसतो तर सांगली जिल्ह्यातील शहरासह नदी लगत असणाऱ्या अनेक गावांना कृष्णेच्या पाण्याच्या दाबामुळे फटका बसतो.

२०१९ आणि २०२१ ला कोयना, चांदोली आणि अलमट्टीच्या दाबामुळे महापुराची स्थिती उद्भवली होती. परंतु सध्या अलमट्टीमधून काही अंशी विसर्ग होत आहे तर कोयना अद्याप ६० टक्क्यांवर भरल्याने विसर्ग कमी आहे. तर चांदोली धरण भरण्याच्या मार्गावर असल्याने विसर्ग वाढवण्यात आला आहे.

मागच्या दोन महापुरांच्या पाण्याच्या विसर्गाच्या तुलनेत हा विसर्ग कमी असल्याने यंदा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याला महापुराचा फटका कमी बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अशातच धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाचा जोर वाढला आहे. पूढचे दोन दिवस अतिवृष्टी झाल्यास पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तीन जिल्ह्यातील महत्वाच्या पुलांवर अशी आहे पाणी पातळी

सांगली जिल्ह्यातील आयर्विन पूलाची इशारा पातळी ही ४० फूट आहे तर धोका पातळी ४५ फूट आहे. सध्या याठिकाणी १९ फुटांच्या आसपास पाणी आहे. तर कृष्णा पूल कराडची धोका पातळी ५५ फूट आहे आताची पाणी पातळी ११ फूट २ इंचांवर आहे.

सांगली जिल्ह्यातील भिलवडी पूलाची धोका पातळी ५३ फूट असून ती आता १८ फूट ०५ इंचावर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील राजापूर बंधारा धोका पातळी ५८ फूट आहे तर ३८ फूट ०४ इंचांवर पाणी वाहत आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीवरील राजाराम बंधाऱ्याची धोका पातळी ४३ फूट असून सध्या ४० फूट ६ इंच पाणी आहे.

कोयनेतून विसर्ग वाढणार

कोयना धरण क्षेत्रात मागच्या २४ तासांपासून अतिवृष्टी झाली. तर हवामान विभागाने पुढचे २४ तास रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे आजपासून दुपारी चार वाजता कोयना धरणाच्या पायथ्याशी विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी कोयना धरणातून विसर्ग वाढवणार आहेत. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात येत आहे.

कोयना धरणाच्या पायथा वीजगृहाचे एक युनिट कार्यान्वित असून कोयना नदीमध्ये १ हजार ५० क्यूसेक प्रतिसेकंद इतका विसर्ग सुरू आहे. तथापि, आज गुरुवारी दुपारी चार वाजता पायथा विद्युतगृहातील दुसरे युनिट सुरू करण्यात आल्यानंतर नदीपात्रात प्रतिसेकंद एकूण २१०० क्यूसेक पाणी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना व कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा धरण व्यवस्थापनाकडून देण्यात आला आहे.

चांदोली धरणाची अशी आहे स्थिती

चांदोली धरणपाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असल्याने आजपासून (ता.२७) पुन्हा पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. विद्युत निर्मिती प्रकल्पातून १६३० क्युसेक व वक्राकार दरवाज्यातून ५१५० क्युसेक विसर्ग असा एकूण ६७८० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे पूरस्थिती निर्माण होऊन नदीकाठची पिके पाण्याखाली गेली आहेत. प्रशासनाकडून नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

चांदोली धरणाची ३४.४० टी.एम.सी क्षमता आहे. धरणात आज अखेर एकूण पाणीसाठा २८.९३ टी एम सी (८४..१०%)पाणीपातळी ८१९.३०४. द.ल.घ.मी इतकी झाली असून आज अखेर १०५५ मीमी पावसाची नोंद झाली. धरणात १४४३ क्युसेक इतकी आवक होत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT