KDCC Bank agrowon
ताज्या बातम्या

Kolhapur District Bank : पीककर्ज वाटपात कोल्हापूर जिल्हा बँकेचा डंका, २ हजार २८६ कोटींचे वाटलं कर्ज

Kolhapur Farmer : शेतकऱ्यांना जिल्हा बँकांकडून अत्यल्प व्याजदरात कृषी पतपुरवठा केला जातो यामुळे अनेक शेतकरी याचा लाभ घेत असतात.

sandeep Shirguppe

Kolhapur Farmer : शेतकऱ्यांना जिल्हा बँकांकडून अत्यल्प व्याजदरात कृषी पतपुरवठा केला जातो यामुळे अनेक शेतकरी याचा लाभ घेत असतात. दरम्यान प्रत्येक जिल्ह्याच्या बँक शेतकऱ्यांना कर्जाचे वाटप करत असतात.

यामध्ये जिल्हा बँकांना उद्दीष्टे दिली जातात. याबाबत राज्यात सर्वाधीक कर्जाचा पुरवठा कोल्हापूर जिल्हा बँकेकडून देण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी जिल्हा बँकेने ११७ टक्के उद्दीष्ट पूर्ण केल्याची माहिती समोर आली आहे.

कृषी पतपुरवठ्याचे ११७ टक्के उद्दिष्ट पूर्तीबद्दल जिल्हा मध्यवर्ती बँकेचा गौरव करण्यात आला. जिल्हास्तरीय सल्लागार व आढावा समितीची बैठक जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. मागीलवर्षी २०२२-२३ मध्ये जिल्हा बँकेला १,९५० कोटी रुपये पीक कर्जपुरवठ्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते.

बँकेने उद्दिष्टाच्याही पुढे जात तब्बल २ हजार २८६ कोटी रुपये पीक कर्जपुरवठा करून ११७ टक्क्यांचे उद्दिष्ट यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. या यशस्वी उद्दिष्ट पूर्तीवर ३३६ कोटी उद्दिष्ट वाढवून यावर्षी म्हणजेच २०२३ - २४ मध्ये २,२८६ कोटी रुपये पीक कर्जाचे उद्दिष्ट दिले आहे.

या बैठकीला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक सुषमा देसाई आदी उपस्थित होते.

दरम्यान, जिल्हास्तरीय तांत्रिक समितीच्या बैठकीमध्ये वाढीव पीककर्ज निश्चिती केली आहे.. त्यानुसार नियमित पीक कर्जाबरोबरच जादाचे म्हणून आडसालीसाठी रोप खरेदी व आंतर पिकासाठी हेक्टरी प्रत्येकी १८ हजार रुपये, पूर्वहंगामी व सुरू लागणीच्या रोप खरेदीसाठी हेक्टरी पाच हजार रुपये, खोडवा पीक पाचट व्यवस्थापनासाठी हेक्टरी नऊ हजार रुपये, खरिपातील सुधारित वाणांच्या भात पीक बीजोत्पादनासाठी हेक्टरी पाच हजार रुपये, अशी वाढ करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT