Crop agrowon
ताज्या बातम्या

Crop Insurance Document : १ रुपयात पीक विमा काढण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत जाणून घ्या?

Crop Insurance Scheme : राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येते.

Team Agrowon

Crop Insurance Document : शेतकऱ्यांवर अस्मानी संकट ओढावलं की मोठ्या प्रमाणात नुकसान होते. यामुळे शेतकऱ्यांना सर्वात पहिला आर्थीक संकटाचा सामना करावा लागतो. यासाठी शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून राज्यात प्रधानमंत्री पीक विमा योजना २०१६-१७ पासून राबविण्यात येते. २०२३-२४ मध्ये राज्यात ही पीक विमा योजना बीड पॅटर्न (८०:११०) आधारित राबविली जाणार आहे.

१ रूपयात विमा मिळवण्यासाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागते. हे सगळं तुम्हाला त्या अर्जात पाहायला मिळणार आहे. तो अर्ज भरताना काळजीपूर्वक माहिती भरावी लागते.

१ रूपयांत विमा मिळवण्यासाठी १) पीकपेरा स्वयं घोषणापत्र, २) सातबारावर उतारा, ३) आधार कार्डशी संलग्न असलेल्या बँकेचे पासबूक, ४) सामाईक खातेदार असल्यास द्यावयाचे संमतीपत्र, दरम्यान तुमच्याकडे अर्ज प्राप्त झाल्यास पहिल्यांदातुमचं नाव भरावं लागेल.

त्यानंतर आधार कार्ड किंवा रेशनकार्डवरती असलेला तुमचा पत्ता व्यवस्थित लिहावा लागेल. त्यानंतर ८ अ उताऱ्याप्रमाणे तुमचं गाव, तुमच्या नावावर असलेलं एकूण क्षेत्र त्या अर्जात नमूद करावे लागेल.

यानंतर बाजरी, सोयाबीन, मूग, उडीद, तूर, कापूस, मका यापैकी जे पीक आहे त्यात लिहावं लागेल. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर, त्याच्या खाली बँकेचे नाव, शाखा, मोबाईल नंबर इत्यादी माहिती तुम्हाला अर्जात भरायची आहे. हा अर्ज असा व्यवस्थित भरल्यास तुम्हाला भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही.

तर राज्य शासनाकडून मदत

यामध्ये विमा कंपनीवर नुकसान भरपाईचे जास्तीत जास्त दायित्व एकूण विमा हप्त्याच्या ११० टक्यांपर्यन्त असणार, या पेक्षा जास्त असणारी नुकसान भरपाई राज्य शासन देण्यात येणार आहे.

तर नुकसान भरपाई एकूण विमा हप्त्याच्या ८० टक्यांपेक्षा कमी आल्यास विमा कंपनी एकूण विमा हप्त्याच्या २० टक्के रक्कम स्वतःकडे नफा म्हणून ठेऊन उर्वरित शिल्लक रक्कम राज्य शासनास परत करणार आहे. या योजनेच्या माध्यमातून सन २०१६-१७ पासून ते २०२२-२३ पर्यंत साधारण रुपये २२,६२९ कोटीची नुकसान भरपाई मंजूर झाली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT