Kisan Sabha Agrowon
ताज्या बातम्या

Kisan Sabha : शेतकऱ्यांची देयके अडवून ठेवल्याने किसान सभा आक्रमक

Kisan Sabha Protest : ‘मनरेगा’अंतर्गत करण्यात आलेल्या गाय गोठा कामाची देयके अडवून ठेवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात गुरुवारी (ता. ३) किसान सभेतर्फे पंचायत समितीसमोर विजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली खादगाव (ता. नांदगाव) ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले.

Team Agrowon

Nasik News : ‘मनरेगा’अंतर्गत करण्यात आलेल्या गाय गोठा कामाची देयके अडवून ठेवणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्याविरोधात गुरुवारी (ता. ३) किसान सभेतर्फे पंचायत समितीसमोर विजय दराडे यांच्या नेतृत्वाखाली खादगाव (ता. नांदगाव) ग्रामस्थांनी धरणे आंदोलन केले. या आंदोलनाची दखल घेत गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित कर्मचाऱ्याची तत्काळ बदली केल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.

‘मनरेगा’अंतर्गत केलेल्या कामांच्या नोंदी ऑनलाइन करण्यासाठी सादर केलेले मस्टर निरंक दाखविण्याचा प्रकार मनरेगा योजनेत होत असल्याने खादगावसह तालुक्यातील अनेक गावांतील कुशल अकुशल लाभार्थींची देयके जाणूनबुजून अडवून ठेवण्याचा प्रकार घडत असल्याने अखिल भारतीय किसान सभेने याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समितीच्या प्रवेशद्वारापुढे आंदोलन केले.

तालुक्यातील अर्धकुशल व कुशल कामगार याची देयके त्वरित लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करावी, गाय, बकरी गोठे प्रकरणी जमा केलेले कार्यारंभ आदेश त्वरित देण्यात यावे, लाभार्थ्याचे पैसे वर्ग झालेले ऑनलाइन दिसत असले तरी प्रत्यक्षात लाभार्थ्यांच्या खात्यावर ती रक्कम जमा झालेली नसल्याचे याचीदेखील चौकशी करत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा करण्यात यावी, आदी विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.

आंदोलनास शिवसेनेचे तालुकाप्रमुख संतोष गुप्ता (ठाकरे गट), राष्ट्रीय समाज पक्षाचे नाना मगर यांनी पाठिंबा दिला. आंदोलनात विजय दराडे, त्र्यंबक ठाकरे, शरद उगले, मधुकर चव्हाण, प्रकाश दराडे, दत्तु घुगे, ज्ञानेश्वर घुगे, विकास दराडे, उत्तम दराडे, अंबादास दराडे, कृष्णा कुणगर, अण्णा दराडे, श्रावण पवार यासह शेतकरी उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या ः

गाय, बकरी गोठ्यांचे अर्धकुशल व कुशल बिलाचे दोन-तीन वर्षांपासून थकित पैसे शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वर्ग करावे.

गेल्या एक वर्षापासून गोठ्यांचे प्रस्ताव जमा केले आहेत, त्यांना मंजुरी द्यावी.

सिंचन विहिरीचे अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव मंजूर नाहीत ते धूळ खात पडून आहेत, त्यांना कार्यारंभ आदेश मिळावा.

गाय गोठ्यांचे नवीन प्रस्ताव स्वीकारून मंजूर करावेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Loan : बँकांनी सर्व कर्जाचे उद्दिष्ट निर्धारित वेळेत पूर्ण करावे

Onion Cultivation : कांदा लागवडीला वेग; क्षेत्र घटण्याची शक्यता

Girna River : गिरणा परिसरातील सर्वच बंधारे तुडुंब

Wildlife Crop Damage : पिकांचे जंगली प्राण्यांपासून संरक्षणासाठी शासन सकारात्मक

MahaDBT : ‘महाडीबीटी’ पोर्टलवर कागदपत्रे अपलोडसह अनेक अडचणी

SCROLL FOR NEXT