Kharif Sowing Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : पाच जिल्ह्यांत २७ लाख हेक्टरवर खरीप

लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून, शुक्रवारपर्यंत (ता. ३०) ७९६.८६ मिलिमीटर इतका पाऊस झाला.

टीम ॲग्रोवन

लातूर : लातूर विभागातील पाच जिल्ह्यात खरीप हंगामातील सरासरी (Kharif Sowing Acreage) क्षेत्र २९ लाख ३५ हजार ८४४ हेक्टर असून, २७ लाख ६२ हजार ४८९ हेक्टर क्षेत्रावर प्रत्यक्ष पेरणी (Kharif Sowing) झाली आहे. नांदेड जिल्ह्यात सरासरी क्षेत्राच्या १०० टक्के, उस्मानाबादमध्ये ११० टक्के तर लातूर, हिंगोली व परभणी जिल्ह्यांत अपेक्षित पेरणी झालीच नाही.

लातूर विभागात मागील सप्ताहात हवामान उष्ण व ढगाळ होते. लातूर विभागातील वार्षिक सरासरी पर्जन्यमान ८१३.३८ मिलिमीटर असून, शुक्रवारपर्यंत (ता. ३०) ७९६.८६ मिलिमीटर इतका पाऊस झाला. तो ३० सप्टेंबरच्या अपेक्षित सरासरी पावसाच्या १०८ टक्के असून, वार्षिक सरासरीच्या ९८ टक्के आहे.

पाच जिल्ह्यातील पीकनिहाय स्थिती

खरीप ज्वारी ः लातूर विभागात खरीप ज्वारी पिकाचे सरासरी क्षेत्र ९४१७८ हेक्टर त्यापैकी ३३७९२ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली. सरासरीच्या ३६ टक्के क्षेत्रावर पेरणी झालेले पीक सध्या पोटरी व कणसे भरण्याच्या अवस्थेत आहे.

तूर ः तुरीचे सरासरी क्षेत्र ३४९२५३ हेक्टर असून २५६३०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या ७३ टक्के पेरणी झालेल्या क्षेत्रातील पीक सध्या वाढीच्या अवस्थेत आहे.

मुग ः मुगाचे सरासरी क्षेत्र ९६८३९ हेक्टर असून आतापर्यंत ५९५१३ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. सरासरीच्या ६१ टक्के क्षेत्रावर असलेले पीक सध्या काढणी अवस्थेत असून, ८० ते ९० टक्के पिकाची काढणी झाली आहे.

उडीद ः उडदाचे सरासरी क्षेत्र ९८९२७ हेक्टर असून, ७५६०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. सरासरीच्या ७६ पेरणी झालेल्या आहे.

सोयाबीन ः सोयाबीनचे पिकाचे सरासरी क्षेत्र १५ लाख ७१ हजार ८६८ हेक्टर असून, १९ लाख ११ हजार ३२८ हेक्टरवर पेरणी झाली आहे. सरासरीच्या १२२ टक्के पेरणी झालेले पीक सद्या शेंगा लागण्याच्या व शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहे.

कापूस ः कापूस पिकाचे सरासरी क्षेत्र ४ लाख ८५ हजार ०८८ हेक्टर आहे. त्यापैकी जवळपास ४ लाख ०२ हजार ०६८ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली.

पीकनिहाय कीड रोग प्रादुर्भावाची स्थिती

नांदेडमध्ये काही ठिकाणी ज्वारीवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव.

हिंगोलीत काही ठिकाणी तुरीवर मर रोगाचा प्रादुर्भाव.

लातूर, उस्मानाबाद व नांदेडमध्ये सोयाबीनवर पिवळा मोझॅक. नांदेड व परभणी जिल्ह्यांत सोयाबीनवर पाने खाणाऱ्या अळी, खोडमाशी व चक्रीभुंग्याचा प्रादुर्भाव.

पाचही जिल्ह्यांमध्ये ऑगस्टमध्ये १५ ते २१ दिवसांचा पावसाचा खंड पडल्यामुळे उत्पादनात घटीची शक्यता.

लातूर, उस्मानाबाद, नांदेड व परभणी जिल्ह्यांनी मध्य हंगाम अधिसूचना काढली.

परभणी व हिंगोली जिल्ह्यांत कपाशीवर तुडतुडे व मावा.

नांदेडमध्ये कपाशीवर करपा व गुलाबी बोंड अळीच्या प्रादुर्भाव.

जिल्हानिहाय खरीप अंतिम क्षेत्र (हेक्टरमध्ये)

लातूर ५८६२०२

उस्मानाबाद ५५३४९६

नांदेड ७६६०१२

परभणी ५१०७२५

हिंगोली ३४६०५४

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Monsoon Rain: मराठवाड्यात पावसाचा जोर कमीच; पूर्व विदर्भ आणि कोकणात पुढील ४ दिवस जोरदार पावसाचा अंदाज

Agrowon Podcast: गव्हाचे भाव स्थिरावले; डाळिंब तेजीत, मुग दबावात, केळीच्या दरात वाढ, उडदाचे भाव स्थिर

ZP School Admission : बोराखेडी जिल्हा परिषद शाळेत प्रवेश ‘ॲडमिशन फुल्ल’

Tree Plantation : जैवविविधता जपण्यासाठी वृक्षारोपण गरजेचे

Farmers Welfare: बच्चू कडू यांच्या मागण्यांना सरकारचा सकारात्मक प्रतिसाद; शेतकरी,मजुरांसाठी आश्वासने

SCROLL FOR NEXT