Kharif Sowing  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Sowing : खरीप पेरा ९३ टक्क्यांवर

Kharif Season 2023 : राज्यात खरीप पिकांचा पेरा आता ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दुसऱ्या बाजूला अतिपावसानंतर आता काही भागात कीडरोगांची समस्या उद्भवली आहे.

Team Agrowon

Pune News : राज्यात खरीप पिकांचा पेरा आता ९३ टक्क्यांच्या पुढे गेला आहे. दुसऱ्या बाजूला अतिपावसानंतर आता काही भागात कीडरोगांची समस्या उद्भवली आहे. लातूर, छत्रपती संभाजीनगर व बीड जिल्ह्यांत सोयाबीनवर तंबाखू पाने खाणाऱ्या अळीचा (स्पोडोप्टेरा) प्रादुर्भाव झाला आहे.

कृषी आयुक्तालयाच्या अहवालानुसार, खरिपाचे राज्याचे सरासरी पेरणीचे क्षेत्र १४२ लाख हेक्टर आहे. सात ऑगस्टअखेर प्रत्यक्षात १३१.७५ लाख हेक्टरवर पेरणी झालेली आहे. राज्यात बहुतेक भागात पेरणीची कामे उरकत आली आहेत. काही ठिकाणी कापूस, सोयाबीन, तूर तसेच भाताच्या पुनर्लागवडीची कामे सुरू आहेत.

राज्यात सोयाबीनचा पेरा ४८.३८ लाख हेक्टरवर तर ४१.४८ लाख हेक्टरवर कपाशीचा पेरा झाला आहे. तुरीचा पेरा १०.७१ लाख हेक्टरवर गेला आहे. १०.७१ लाख हेक्टरवर भाताची पुनर्लागवड झाली आहे.

राज्यात एक जून ते सात ऑगस्ट दरम्यान सरासरी ६०३ मिलिमीटर पाऊस होतो. प्रत्यक्षात यंदा ६०२ मिलिमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच १०० टक्के पाऊस झालेला आहे.

दरम्यान, यंदाच्या खरिपात राज्यात २१.७८ लाख क्विंटल बियाणे उपलब्ध होते. त्यापैकी १९.७० लाख क्विंटल बियाण्यांचा पुरवठा पूर्ण झालेला आहे. खतेदेखील ५३.३९ लाख टनाच्या आसपास पुरविली आहेत. त्यापैकी शेतकऱ्यांनी आतापर्यंत २९.२६ लाख टन खते विकत घेतली आहेत. अजूनही २४.१३ लाख टनाचा साठा उपलब्ध आहे.

पीक स्पर्धेसाठी करा अर्ज

कृषी विभागाने यंदाच्या खरीप हंगाम पीकस्पर्धेची तयारी पूर्ण केली आहे. भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी, तूर, सोयाबीन, भुईमूग, सूर्यफुलाच्या पीक स्पर्धेसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करावे लागतील. कृषी विभागाने कीडरोगांना रोखण्यासाठी क्रॉपसॅप प्रकल्पातून सोयाबीन, कापूस, भात, मका, ज्वारी आणि ऊस पिकांचे सर्वेक्षण सुरु आहे.

तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवणार

शेतकऱ्यांना खते, कीटकनाशके व बियाणे याबाबत समस्या असल्यास तक्रार करण्याचे आवाहन कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी केले आहे. ८४४६११७५००, ८४४६२२१७५०, ८४४६३३१७५० या भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच ९८२२४४६६५५ या क्रमांकावर व्हॉटस्अपवर तक्रार करावी. तक्रारकर्त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल, असे आयुक्तालयाने स्पष्ट केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Compensation : काहींना नुकसान भरपाईचे वाटप तर अनेकांना अजूनही प्रतीक्षाच

Sugarcane Season : साखर कारखाना परिसरात ऊसतोड मजुरांच्या राहुट्या

Paddy Harvesting : चिखलातून भात कापणी, मळणीमुळे कष्ट वाढले

Onion Market : ओल्या कांद्यामुळे भावात सहाशेची घसरण

Animal Fodder : गडहिंग्लज तालुक्यात मुबलक चारा उपलब्ध

SCROLL FOR NEXT