Kharif Seed Supply  Agrowon
ताज्या बातम्या

Kharif Seed : खरीप पिकांचे बियाणे नांदेड येथे उपलब्ध

Kharif Season 2023 : परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर उत्पादित करण्यात आलेल्या प्रमुख खरीप पिकांचे बियाणे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र येथे उपलब्ध करण्यात आले आहे.

Team Agrowon

Nanded News : परभणी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाद्वारे प्रसारित आणि विद्यापीठाच्या प्रक्षेत्रांवर उत्पादित करण्यात आलेल्या प्रमुख खरीप पिकांचे बियाणे नांदेड येथील कापूस संशोधन केंद्र येथे उपलब्ध करण्यात आले आहे. त्यामुळे नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परभणी येथे विद्यापीठात जाणे टळणार आहे.

नांदेड येथील कापूस संशोधन केंद्रात विविध पिकांचे बियाणे उपलब्ध आहे. यात सोयाबीन, तूर, ज्वारी, मूग आदी पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. सोयाबीनचा ‘एमएयूएस १६२’ हा वाण उपलब्ध आहे. हा कंबाईन हार्वेस्टर यंत्राद्वारे काढणीस उपयुक्त राज्यातील एकमेव वाण आहे. १००-१०५ दिवसांत हा वाण तयार होतो.

याच्या शेंगा पक्वतेनंतर १०-१२ दिवस फुटत नाहीत. सोयाबीन ‘एमएयूएस १५८’ हा वाण चक्री भुंगा, खोडमाशी व शेंगा पोखरणारी अळी या किडी तसेच शेंगांवरील करपा व पानावरील ठिपके रोगांना सहनशील असणारा अधिक उत्पादनक्षम वाण आहे. सोयाबीनच्या दोन्ही वाणांच्या पिशवीचे वजन २६ किलोग्रॅम आहे. याची किंमत ३९०० रुपये आहे.

तुरीचा ‘बीएसएमआर ७३६’ हा मर आणि वंध्यत्व रोगास रोगास प्रतिकारक असणारा १७५-१८० दिवसांत तयार होणारा, लाल रंगाचे दाणे असणारा व आंतरपीक पद्धतीसाठी योग्य असणारा वाण आहे. ज्वारीचा ‘परभणी शक्ती’ हा लोह व जस्ताचे प्रमाण अधिक असणारा वाण आहे.

या वाणाच्या पिशव्यांचे वजन ४ किलोग्रॅम असून, एका पिशवीची किंमत ४०० रुपये आहे. मुगाचा ‘बीएम २००३-२’ हा वाण एकाच वेळी काढणीस येणारा, भुरी रोगास प्रतिबंधक, टपोरे चमकदार दाणे असणारा हा ६५-७० दिवसांत तयार होणारा वाण उपलब्ध आहे.

याच्या सहा किलोच्या पिशवीची किंमत १०८० रुपये आहे. हे बियाणे कापूस संशोधन केंद्र, देगलूर रोड, नांदेड येथे कार्यालयीन वेळेत विक्री करण्यात येत आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन विद्यापीठाचे सहयोगी संचालक डॉ. के. एस. बेग यांनी केले

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Cotton, Soybean Rate : कापूस, सोयाबीन, कांदा कुणाची बत्ती गूल करणार? कुणाला फायदा होणार? उद्या होणार उघड

ST Bus : एसटी महामंडळाच्या पन्नास टक्के फेऱ्या रद्द

Chana Cultivation : डहाणूत हरभरा लागवडीवर भर

La Nina Development : ला निना पुढच्या महिन्यात येणार? डिसेंबर ते फेब्रुवारीच्या दरम्यान निर्मितीचा अपेक हवामान केंद्राचा अंदाज 

Solapur Assembly Voting : वाढलेला एक टक्का कोणाच्या पारड्यात पडणार?

SCROLL FOR NEXT