Jalgaon News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३५० व्या शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधून राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन (Rural Development Minister Girish Mahajan) यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील ३५० पेक्षा अधिकच्या गावांमध्ये शेतकऱ्यांना विविध योजनेंतर्गत बियाण्याचे वितरण करण्यात आले.
यानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय आवारात जिल्हाधिकारी अमन मित्तल, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संभाजी ठाकूर, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक श्री. चलवदे, जिल्हा दूध उत्पादक संघाचे संचालक अरविंद देशमुख, तालुका कृषी अधिकारी शिवाजी राऊत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले.
कृषी विभागाचे डॉ. राधेश्याम चौधरी, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, गोपाळ भंगाळे, मिलिंद चौधरी, समाधान धनगर उपस्थित होते.
एकाच अर्जावर योजनांचा लाभ
शेतकऱ्यांना एकाच अर्जावर ऑनलाईन पद्धतीने विविध योजनांचा लाभ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.
शेती व शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासाच्या दृष्टीने पावले टाकत असून, नवीन योजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत, त्याचा शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन गिरीश महाजन यांनी शेतकऱ्यांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधताना केले.
या योजनांचा समावेश
शेतकऱ्यांसाठी केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जलयुक्त शिवार योजना २, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा टप्पा २), बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय (स्मार्ट),फुंडकर फळबाग लागवड योजना, मॅग्नेट, राष्ट्रीय फलोत्पादन अभियान, राष्ट्रीय कृषी विकास योजना, कृषी सिंचन योजना, आत्मा, राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान आदी योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवश्यक असणारा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.