Khadakwasla Dam Agrowon
ताज्या बातम्या

Khadakwasla Canal : खडकवासला बोगदा कालवा अहवाल छाननीचे काम सुरू

Department Of Water Resources : खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा दरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीच्या कालव्याचा अहवाल जलसंपदा विभागाकडून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे.

Team Agrowon

Pune News : खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा दरम्यान प्रस्तावित असलेल्या २८ किलोमीटर लांबीच्या कालव्याचा अहवाल जलसंपदा विभागाकडून राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे.

या समितीकडून अहवालाची छाननी सुरू करण्यात आली. समितीकडून मान्यता मिळाल्यानंतर या प्रकल्पाचे काम सुरू करण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या प्रकल्पामुळे सुमारे अडीच टीएमसी पाणी वाचणार आहे, अशी माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

खडकवासला धरण ते फुरसुंगी बोगदा या प्रकल्पाचा अहवाल तयार करण्यासाठी निविदा काढून काम देण्यात आले होते. संबंधित कंपनीकडून याबाबतचा अहवाल तांत्रिक मान्यतेसाठी सध्या जलसंपदा विभागाच्या मुख्य अभियंत्यांकडे सादर करण्यात आला आहे.

जलसंपदा विभागाकडून त्यांची छाननी पूर्ण करून हा अहवाल तांत्रिक सल्लागार समितीकडे पाठविण्यात आला आहे. या समितीने प्रकल्पाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर राज्य शासनाची मान्यता घेऊन तातडीने कामाला सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच पाणी गळती कमी होऊन शेतीलादेखील पाणी मिळण्यास मदत होणार आहे.

टीडीआरबाबत चाचपणी सुरू

खडकवासला धरण ते फुरसुंगी या दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर असलेल्या कालव्याच्या जागेचा उपयोग व्यावसायिक कारणांसाठी करता येणे शक्य आहे. त्यातील काही भाग महापालिका व पीएमआरडीए हद्दीत येतो.

त्यामुळे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर जागा कोणत्या स्थानिक स्वराज्य संस्थेकडे हस्तांतरित करावी, याचा निर्णय राज्य सरकारच घेणार आहे. तसेच यातून जलसंपदा विभागाला अतिरिक्त हस्तांतरण विकास हक्क (टीडीआर) मिळेल किंवा कसे, याचीही चाचपणी करण्यात येणार आहे.

खडकवासला ते फुरसुंगीदरम्यान बंद कालव्यातून पाणी नेण्याच्या प्रस्तावाचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत करण्यात आले. प्रस्तावाला पवार यांनीदेखील अनुकूलता दर्शविली आहे. निधीबाबत वित्त विभागाशी चर्चा करून लवकरच निर्णय घेण्यात येईल.
- ह. वि. गुणाले, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग, पुणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maratha Reservation: मराठा आरक्षणाचा जीआर बेकायदशीर: छगन भुजबळ

Paddy Farming : भातपिकावर कीड-रोगांचा प्रादुर्भाव

Dragon Fruit Plantation: ड्रॅगन फ्रूट लागवडीची योग्य पद्धत कोणती? पीक व्यवस्थापन कसे करावे?

ZP Election : सांगली जिल्हा परिषदेसाठी इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष

Food Processing Industry : प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेत शेतकरी, बचत गटांना संधी

SCROLL FOR NEXT