Nira Canal Irrigation : नीरा उजव्या कालव्यास पाणी सोडावे

Agriculture Irrigation : संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, माळशिरस तालुक्यात फक्त गार वारा सुरू आहे. ऐन पावसाळ्यात नीरा उजवा कालवा बंद आहे.
Nira Canal
Nira CanalAgrowon

Nira Canal Agriculture Irrigation : संपूर्ण राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मात्र, माळशिरस तालुक्यात फक्त गार वारा सुरू आहे. ऐन पावसाळ्यात नीरा उजवा कालवा बंद आहे. नीरा उजवा कालव्यावर अवलंबून असणाऱ्या अनेक शहरांना एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू आहे.

नीरा खोऱ्यातील वीर, देवधर, भाटघर, गुंजवणी धरणांवर मागील दोन दिवसांपासून पाऊस सुरू झाल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे नीरा उजवा कालव्यास पाणी सोडल्यास ऐन पावसाळ्यात शेतातील जळून जाणारी उभी पिके वाचणार आहेत.

नीरा उजवा कालवा व नीरा डावा कालव्यावरील शेतकऱ्यांना आणि शहरांना दिलासा मिळालेला आहे. मात्र पाऊस नसल्यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. पाटबंधारे विभागाने २४ जूनपासून नीरा उजवा कालव्यास पाणी सोडणे बंद केले आहे.

Nira Canal
Agriculture Irrigation : शेतकऱ्यांच्या पाणीप्रश्नाबाबत रस्त्यावर उतरू

फक्त पिण्याच्या पाण्यासाठी काही दिवस कालवा सुरू झालेला होता. आता धरण क्षेत्रावर पाऊस सुरू झाल्याचे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाने उभ्या पिकांसाठी त्वरित कालवे सुरू करणे गरजेचे आहे; अन्यथा ऐन पावसाळ्यात शेतातील उभी पिके जळून जाणार आहेत.

आषाढ महिन्यात नक्की पाऊस येणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मका, बाजरी, तूर, सोयाबीन आदी पिकांची पेरणी केलेली आहे. पाऊस नसल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात या पिकांची वाढ झालेली नाही.

Nira Canal
Agriculture Irrigation : डिंभे धरणातून उजव्या, डाव्या कालव्याला पाणी सोडले

माळशिरस तालुक्यातील अनेक शेतकरी माण तालुक्यातील दूध उत्पादकांना आपला उभा ऊस गुंठ्यावर विक्री करू लागले आहेत. दुभत्या जनावरांना हिरवा चारा नसल्यामुळे दुधाच्या उत्पादनात मोठी घट होणार आहे. मागील दोन दिवसांपासून नीरा खोरेच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस सुरू झाला आहे.

मागील वर्षीच्या तुलनेत ५० टक्के पाणीसाठा असला तरी काहीच नसल्यापेक्षा पाऊस सुरू झाल्याने शेतकरी वर्गात समाधान व्यक्त केले जात आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी नीरा खोऱ्यात १४.३४ टीएमसी एवढा पाणीसाठा कमी आहे.

Nira Canal
Agriculture Irrigation : मालेगावात विहिरींची प्रशासकीय मान्यता रखडली

सातारा जिल्ह्यातील फलटण, खंडाळा व सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर, सांगोला तालुक्यांना नीरा खोऱ्यातील वीर भाटघर व नीरा देवधर या धरणांमधील पाण्याचा वापर सिंचन, पाणीपुरवठा तसेच औद्योगिक वापरासाठी होत असतो. दरवर्षी या महिन्यात नवीन उसाची लागण सुरू होत असते. तेही यंदा कुठे होताना दिसत नाही. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी धरणात पाणीसाठा खूपच कमी झाला होता.

या खोऱ्यात वीर, भाटघर, नीरा, देवधर ही चार धरणे आहेत. या चार धरणात गुरुवारी (ता. २०) सकाळी सहा ते सायंकाळी चार या दहा तासांत १.२७ टीएमसीने पाणीसाठा वाढलेला आहे. यावर्षीच्या मोसमात गुरुवारी सायंकाळी चार वाजेपर्यंत नीरा खोऱ्यातील सर्व धरणांत मिळून एकूण पाणीसाठा १९.५० टीएमसी एवढा झाला असून, सरासरी ४०.३६ टक्के साठा झालेला आहे.

धरणांतील पाणीसाठ्याची सद्य:स्थिती

वीर धरणातील पाणीसाठा ३.२२ टीएमसी (३४.२६ टक्के)

भाटघर धरणातील पाणीसाठा ९.३६ टीएमसी (३९.७६ टक्के)

नीरा देवधर धरणातील पाणीसाठा ५.४९ टीएमसी (४७.६६ टक्के)

गुंजवणी धरणातील पाणीसाठा १.४२ टीएमसी .३८.५३ टक्के)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com