Kasturi Brand Agrowon
ताज्या बातम्या

Kasturi Cotton : आंतरराष्ट्रीय स्तरावर दरवळणार ‘कस्तुरी ब्रॅण्ड’चा सुगंध

प्रमोशनसाठी ‘सीसीआय’- टेक्‍सप्रोसिल यांच्यात करार

Team Agrowon


विनोद इंगोले ः ॲग्रोवन वृत्तसेवा
नागपूर ः अमेरिकेतील पिमा आणि ऑस्ट्रेलियातील गीजा कॉटनच्या धर्तीवर भारतीय कापूस गाठीचा कस्तुरी हा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड विकसित करण्यात आला. परंतु गेल्या दोन वर्षांत ब्रॅण्डच्या नावाने कापूस गाठी विक्रीचा प्रयत्न झाला नाही. त्यामुळे केंद्र शासनाने ‘कस्तुरी ब्रॅण्ड’ने विक्रीला चालना मिळावी, यासाठी भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय) आणि टेक्‍सप्रोसिल (दि कॉटन टेक्स्टाइल एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिल) यांच्यात सामंजस्य करार करण्यात आलात. वाराणसी येथे पीयूष गोयल यांच्या उपस्थितीत झालेल्या परिषदेत हा करार झाला.

जागतिकस्तरावर कापसाखालील सर्वाधिक क्षेत्र भारतात आहे. सुमारे १३० लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड होते. मात्र उत्पादकतेच्या बाबतीत भारताची पिछाडी आहे. सोबतच कचऱ्याचे प्रमाणही अधिक असल्याने भारतीय कापूस गाठींवर प्रक्रिया करताना उद्योजकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्या पार्श्‍वभूमीवर कापसाची एकसारखी आणि निर्धारित प्रत असावी, यासाठी भारतीय कापसाच्या विक्रीसाठी खास परिमाण निश्‍चित करण्यात आले. त्या कापसाला ‘कस्तुरी’ हे ब्रॅण्ड नाव देण्यात आले. ७ फेब्रुवारी २०२० रोजी ‘कस्तुरी’ला मान्यता मिळाली. परंतु त्यानंतरच्या काळात या ब्रॅण्डने कापूस गाठी तयार करून त्याच्या विक्रीचे विशेष प्रयत्न झाले नाहीत.

दरम्यान, आता केंद्र सरकारने ‘कस्तुरी’ला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. कापसाच्या बाबतीत भारताची प्रतिमा सुधारण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी हा सामंजस्य करार करण्यात आला. करारानुसार, टेक्‍सप्रोसिलची अंमलबजावणी यंत्रणा राहील. ‘ट्रेसेबिलिटी’ या ब्रॅण्डला आंतरराष्ट्रीय प्रमोशन करणे, एखादा जिनर्स कस्तुरी ब्रॅण्डने गाठ तयार करण्यास इच्छुक असेल, तर गाठ तयार करण्याच्या विविध टप्प्यांवर ती परिमाणानुसार योग्य आहे किंवा नाही, याचे संनियंत्रण करणे, त्यासाठी विविध समित्यांचे गठण करणे आदी जबाबदाऱ्या ‘टेक्‍सप्रोसिल’ला पार पाडाव्या लागतील.
करारानुसार, ‘सीसीआय’ या प्रक्रियेत निधीचे मॉनिटरिंग करेल, उद्दिष्टाची अंमलबजावणी होत आहे किंवा नाही, हे देखील ‘सीसीआय’ तपासेल. सोबतच अंमलबजावणीत काही अडचणी आल्या त्या सरकारसमोर मांडून त्या समस्यांच्या सोडवणुकीसाठी प्रयत्न ‘सीसीआय’ करेल.

-
कोट ः
‘कस्तुरी’ हा ब्रॅण्ड २०२० मध्ये जाहीर केला. आता त्याला प्रोत्साहन दिले जात आहे. त्यासाठीचा करार ‘सीसीआय’ आय ‘टेक्‍सप्रोसिल’ यांच्यात वाराणसी येथे झाला. कस्तुरी ब्रॅण्डने किती निर्यात होईल, हे तुर्तास सांगणे कठीण आहे. कारण जिनर्ससाठी ते ऐच्छिक असल्याने त्यांच्याकडूनच प्रतिसाद मिळणे अपेक्षित आहे.
- ललितकुमार गुप्ता, व्यवस्थापकीय संचालक,
भारतीय कापूस महामंडळ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

EL Nino 2026 : तेलंगणामध्ये पावसाची तूट; केंद्र सरकारकडे २० हजार कोटींच्या मदत पॅकेजची मागणी

Weekly Weather: उघडिपीसह अल्प पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT