Green House Gas : कार्बन क्रेडिटसाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर हरितगृह

कार्बन क्रेडिट हा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर हरितगृह वायू कमी करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे.
Green House Gas
Green House GasAgrowon

जालना : कार्बन क्रेडिट (Carbon Credit) हा प्रकार आंतरराष्ट्रीय स्तरावर हरितगृह वायू (Green House Gases) कमी करण्याच्या दिशेने उचललेले पाऊल आहे. एक कार्बन क्रेडिट हे एक टन कार्बन डायऑक्साइड वायूंचा (Carbon Dioxide Gas ) समान मानले जाते व बाजारात हे विकले किंवा खरेदी केले जाऊ शकते. आजच्या काळात ही एक नवी बाजारपेठ आकार देऊन रुजू होत असल्याचे मत महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद पुणेचे संचालक संशोधन डॉ. हरिहर कौसडिकर यांनी व्यक्त केले.

कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे आयोजित कृषी विज्ञान मंडळाच्या मासिक चर्चासत्राचे आयोजन कृषी विज्ञान केंद्र खरपुडी येथे करण्यात आले होते. त्यामध्ये प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. कौसडीकर बोलत होते.

Green House Gas
Crop Loan : रब्बी पीककर्जाचे १३.६६ टक्के वाटप

या कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून सुदामअप्पा साळुंके आयसीएआर-अटारी, पुणेचे संचालक डॉ. लाखन सिंग, बांबू सोसायटी ऑफ इंडिया महाराष्ट्राचे संचालक अरुण वांद्रे, कृषी विज्ञान केंद्र बदनापूरचे कार्यक्रम समन्वयक डॉ. सचिन सोमवंशी, एमजीएम गांधेली कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. सुकासे तसेच कृषी विज्ञान केंद्र खरपुडी जालनाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख प्रमुख डॉ. एस. व्ही. सोनुने यांची प्रमुख उपस्थिती होती.

Green House Gas
Agriculture : शेतीचे प्रश्‍न एकमेकांत गुंतलेले

डॉ. कौसडीकर म्हणाले, की एक कार्बन क्रेडिट चे मूल्य हे १७८६ रुपये आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात या मोहिमेत सहभागी होऊन कार्बन क्रेडिट चा फायदा घ्यावा.बांबू लागवड करताना शेतकऱ्यांनी सध्याची परिस्थिती आणि बाजारात मागणी किती आहे हे पहावे.

कोणकोणत्या जाती तसेच त्या बांबूचा औद्योगिक वापर करताना काय आवश्यकता आहे यानुसार बांबू लागवड करावी.असेही ते म्हणाले. डॉ. लाखन सिंग यांचा सेवानिवृत्ती बद्दल कृषी विज्ञान मंडळाच्यावतीने स्मृतिचिन्ह, शॉल व पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला. राहुल चौधरी यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमास पंचक्रोशीतून शेतकरी व महिलांची उपस्थिती होती.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com