Sugar Factory Agrowon
ताज्या बातम्या

Sugar Factory : येडेश्वरी शुगरला थकीत ऊसबिले देण्याचे सहसंचालकांचे आदेश

जनहितचे बेमुदत धरणे तूर्त मागे

Team Agrowon

सोलापूर ः खामगाव (ता.बार्शी) येथील येडेश्वरी शुगरने (Yedeshwari Sugar) शेतकऱ्यांची २०१४-१५ च्या गाळप हंगामातील थकीत उसाची बिले (Sugarcane Bill) जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिलेल्या आदेशाप्रमाणे तत्काळ द्यावीत, असे आदेश प्रादेशिक सहसंचालक राजेंद्र दराडे (Rajendra Darade) यांनी दिले आहेत. त्यामुळे या मागणीसाठी सुरू असलेले जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी सुरू केलेले बेमुदत धरणे आंदोलन तूर्त मागे घेतले आहे.

खामगाव येथील कुमुदा-आर्यन शुगर्सकडे २०१४-१५ च्या गाळप हंगामातील उसाची बिले थकीत आहेत. पण अलीकडेच या कारखान्याच्या लिलावात हा कारखाना येडेश्वरी शुगरने खरेदी केला आहे. या खरेदीवेळी येडेश्वरी शुगरचे चेअरमन बजरंग सोनवणे यांनी कारखान्याची मागची थकीत बिले शेतकऱ्यांना देण्याचे आश्वासन दिले होते. पण या आश्वासनाला आता दोन महिने उलटले, तरी ही बिले अद्याप मिळालेली नाहीत.

त्यामुळे जनहितचे देशमुख यांनी कारखान्याच्या समोर थेट बेमुदत आंदोलनाला सुरुवात केली होती. गेल्या काही दिवसांपासून त्यांचे हे आंदोलन सुरू आहे. पण कोणतीच दखल घेतली नसल्याने त्यांनी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील वर्षा निवासस्थानासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर प्रादेशिक सहसंचालकांनी तातडीने त्याची दखल घेऊन हे आदेश दिले आहेत. या आदेशामुळे श्री. देशमुख यांनीही तूर्त हे आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Subsidy : २०२३ च्या कांदा अनुदानासाठी २८ कोटी रुपये मंजूर; शासन निर्णय प्रसिद्ध

Hydrogen Fuel cooking: आता हायड्रोजन इंधनावर स्वयंपाक शक्य

Heavy Rain: दमदार पावसाने ४६ हजार हेक्टरवरील पिकांना संजीवनी

Agriculture Success: तांत्रिक व्यवस्थापनातून फळबाग शेतीत समृद्धी

Dairy Business: दुग्ध व्यवसायाने पालटेल विदर्भाचे चित्र

SCROLL FOR NEXT