Water Crisis Agrowon
ताज्या बातम्या

Water Crisis : जत तालुका पावसाअभावी कोरडाच

Jat Water Issue : शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. तालुक्यातील २७ पैकी १९ तलाव कोरडे पडले आहेत.

Team Agrowon

Sangli News : जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. मात्र, जत तालुका अजूनही कोरडाच आहे. शेतकरी पावसाची प्रतीक्षा करत आहेत. तालुक्यातील २७ पैकी १९ तलाव कोरडे पडले आहेत.

शिवाय, जनावरांच्या पाण्याचा व चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. परिणामी पावसाने ओढ दिल्याने अनेक गावांमध्ये टँकर मागणीची शक्यता निर्माण झाली आहे. जत तालुक्यात जुलैमध्ये केवळ अकरा दिवस पाऊस झाला असून १११.४ मिमी पावसाची नोंद झाली.

तालुक्यात मॉन्सूनपूर्व पावसाने प्रतिवर्षी पेरणीला सुरुवात होते. जनावरांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली लागतो. त्यातच गेल्या चार वर्षांत परतीचा पाऊस आणि मॉन्सूनोत्तर पाऊसही चांगला बरसला आहे.

त्यामुळे गतवर्षापर्यंत पाणी आणि चारा टंचाई निर्माण झाली नाही. यंदा मॉन्सूनपूर्व पाऊस झालाच नाही. त्यामुळे पेरण्याही खोळंबल्या असल्याचे चित्र होते. त्यामुळे शेतकरी मॉन्सूनपूर्व पावसाचीही प्रतीक्षा करत होता. परंतु उन्हाळी पाऊस झालाच नाही. त्यामुळे शेतकरी संकटात सापडले.

सांगली जिल्ह्यात तर पूर्वेला दुष्काळ अन् पश्चिमेला सुकाळ, असा निसर्गाचा विरोधाभास पाहायला मिळतोय. एकीकडे, शिराळा तालुक्यातील चांदोली धरण ८२ टक्के भरले आहे, तर दुसरीकडे जत तालुक्यातील एका मध्यम प्रकल्पासह १८ तलाव कोरडे आहेत. म्हैसाळ योजनेचे पाणी सोडण्यात आले आहे.

यातून पश्चिम भागातील सात ते आठ तलाव भरले जातील. मात्र, पूर्व भागात पाण्यासाठी वणवण करावी लागण्याची शक्यता आहे. शिवाय, पिण्याचे पाणी व अपुऱ्या चाऱ्याअभावी जनावरांवरही उपासमारीची वेळ आली आहे. जिथे आपले पोट भरत नाही, तिथे जनावरांच्या पोटाची सोय कुठून करायची, या विवंचनेत शेतकरी आहेत. त्यामुळे अनेक गावांत शेतकऱ्यांवर जनावरे विकण्याची वेळ आली आहे.

जतमध्ये खरिपाचे सरासरी क्षेत्र ७८२१० हेक्टर असून त्यापैकी १३१६४ हेक्टरवर पेरा झाला आहे. तालुक्यात जुलैमध्ये केवळ ११ दिवस पाऊस झाला. वास्तविक, कधी रिपरिप, तर कधी हलका पाऊस पडला आहे. तालुक्यात १११.४ मिमी पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे डाळिंब, द्राक्षासह अन्य पिकांना टँकरने पाणी देण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नसल्याचे चित्र आहे. ही पिके जगवण्यासाठी शेतकऱ्यांची डपड सुरू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT