Water Shortage In Jat : जत तालुक्यात टंचाईचे भीषण संकट

जत तालुक्यात उन्हाच्या झळा तीव्र बसत असून यामुळे तालुक्यातील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला असल्याचे चित्र आहे.
Water Shortage
Water ShortageAgrowon

Sangli News : जत तालुक्यात उन्हाच्या झळा तीव्र बसत असून यामुळे तालुक्यातील पाणीसाठा झपाट्याने खालावत चालला असल्याचे चित्र आहे. जत व संख विभागाकडील २७ पैकी १२ तलावांत मृत पाणीसाठा असून आणखी सहा ते सात तलावांची पातळी चिंताजनक बनत चालली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासोबत येथील गावात जनावरांच्या पिण्याचाही प्रश्न गंभीर होत आहे.

दरम्यान, जत पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाकडून (Water supply Departnebt) ५३ गावांतील टंचाई लक्षात घेता. या गावांचा आराखडा तयार केला आहे. शिवाय, लवकरच याठिकाणी टंचाईमधून पिण्याचा पाण्याचा व जनावरांच्या पाण्यासाठी उपाययोजना राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून कोसारी व शेगाव क्र. २ या तलावात पाणी सोडण्यात येत आहे. प्रतापपूर तलावात पाणी सोडून तो ४२.६३ द.ल.घ.फू. इतका भरून घेण्यात आला आहे. शिवाय, सनमडी तलावात पाणी सोडण्यासाठी शेतकऱ्यांची मागणी आहे.

त्यामुळे लवकरच येथील शेतकरी पैसे भरल्यानंतर तेथे पाणी सोडण्याची व्यवस्था म्हैसाळ योजनेच्या कार्यालयाकडून केली जाणार आहे.

Water Shortage
Water Shortage : जळगाव जिल्ह्यांत टंचाई वाढू लागली

मात्र, जतच्या पूर्व भागातील तलावाची स्थिती दयनीय असून या तलावात म्हैसाळ योजनेचे पाणी जात नसल्याने येथील तलावांना पावसाच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे उन्हाळ्यात पाण्याच्या मोठ्या समस्येला शेतकऱ्यांना तोंड द्यावे लागत आहे.

काही गावात टँकरची मागणी असताना प्रशासनाकडून टँकरमुक्त धोरण अवलंबल्याने शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना आहे. त्यामुळे पूर्व भागात पाण्याचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खासगी टँकरवर भर

सध्या तालुक्यात उन्हाची तीव्रता अधिक आहे. अनेक ठिकाणी पाणवठे कोरडे पडले असून विहिरींनी तळ गाठला आहे. बोअरचे पाणी गेले आहे. शिवाय, अनेक शेतकऱ्यांना काही प्रमाणात आधार असणाऱ्या तलावांतील पाण्याने तळ गाठला आहे.

त्यामुळे ग्रामीण भागात पाण्याचे भीषण संकट आहे. पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहेच. बागा जगविण्यासाठी शेवटी खासगी टँकरवर भर द्यावा लागत आहे. हे चित्र बदलणार कधी, अशी विचारणा शेतकऱ्यांतून केली जात आहे.

Water Shortage
Water Shortage : गोंदिया जिल्ह्यातील ७८ गावांसाठी पाणीटंचाईचा आठ कोटींचा आराखडा

पाणीसाठा स्थिती (द.ल.घ.फू.)

सनमडी ७.४१, बेळुंकी ९.८७, डफळापूर ४.०१, मिरवाड ६.३३, रेवनाळ २९.९४, तिप्पेहळळी ८.९०, कोसारी १३.३४, बिळूर (के) १७.३८, गुगवाड २२.२५, उमराणी ८.४०, तिकोंडी क्र. २ कोरडा, दरीबडची ८.५५.

या तलावांची मृतसाठ्याकडे वाटचाल

खोजनवाडी, गुगवाड, येळवी, सोरडी, अंकलगी, सिद्धनाथ या तलावांची वाटचाल मृतसाठ्याकडे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com