Miyawaki Technology  Agrowon
ताज्या बातम्या

Miyawaki Technology : रत्नागिरी जिल्ह्यात करणार जपानी ‘मियावाकी’ तंत्राचा वापर

वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची होणारी हानी टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या जपानी मियावाकी तंत्राचा वापर रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येणार आहे.

Team Agrowon

रत्नागिरी ः वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी आणि पर्यावरणाची (Environment) होणारी हानी टाळण्यासाठी प्रभावी ठरलेल्या जपानी मियावाकी तंत्राचा (Miyawaki Technology) वापर रत्नागिरी जिल्ह्यात करण्यात येणार आहे. नाणिज-खानू देवराईजवळील सुमारे १० गुंठे जागेवर स्थानिक प्रजातींची झाडे लावण्यात येणार आहेत. १६ लाखाचा हा प्रस्ताव असून सामाजिक वनीकरण विभागाने तो मंजुरीसाठी प्रशासनाला सादर केला आहे. कमी जागेत उभारणार घनदाट जंगल उभारण्याची ही पद्धत आहे.

राज्यात मुंबईसह जालना, औरंगाबाद, पुणे, जळगाव, नांदेड जिल्ह्यांमध्ये प्रायोगिक तत्त्वावर जपानी मियावाकी तंत्रज्ञानाचा वापर करून घनदाट वृक्ष लागवड करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून सागरी भागात असलेली खारफुटीची जंगले नष्ट होऊ लागली असून, तेथे सिमेंट काँक्रिटचे बांधकाम होऊ लागले आहे. काही ठिकाणच्या भागात असलेला हरितपट्टाही अतिक्रमणामुळे नष्ट होऊ लागला आहे. यावर मात करण्यासाठी आता प्रशासनाने जपानी पद्धतीचे ‘मियावाकी’ तंत्रज्ञान वापरून वृक्ष लागवड करण्याचा निर्णय घेतला आहे. या मियावाकी पद्धतीमध्ये अगदी कमी जागेत अधिक झाडांची लागवड केली जाते. राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमाअंतर्गत ही वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सामाजिक वनीकरण विभागाने जिल्ह्यातील जपानी मियावाका तंत्रज्ञानाचा पहिला प्रस्ताव तयार केला आहे.

खानू येथील वनराईच्या जवळपास ही जागा आहे. यामध्ये विविध प्रजातीच्या झाडांचा समावेश आहे. सर्वच झाडांची चांगली वाढ होऊन घनदाट जंगल तयार होते.

नाणीज-खानू येथे दहा गुंठे जागेवर ‘मियावाकी’ पद्धतीचा घनदाट जंगलाचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाला दिला आहे; मात्र अजून त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही. १६ लाखांचा हा प्रस्ताव असून प्रदूषण नियंत्रणाच्या दृष्टीने फायदेशीर ठरणार आहे. स्थानिक विविध प्रजातीची झाडे यामध्ये लावण्यात येणार आहेत.

- प्रियंका लगड,

सामाजिक वनीकरण अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Maharashtra 2026 : दुष्काळाच्या स्थितीत शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही; मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांची ग्वाही

Maharashtra Cabinet Decisions: साखर कारखाने, ऊस शेतकऱ्यांना दिलासा; ७५० कोटींच्या सॉफ्ट लोन धोरणाला मंजुरी, मुख्यमंत्र्यांची माहिती

Dam Water Storage Update: यावल, रावेरातील प्रमुख सिंचन प्रकल्प भरले

Maharashtra Rain Update: विदर्भातील चार जिल्ह्यांत पावसाचा अंदाज; उर्वरित राज्यात उघडीप कायम

Rainfall Deficit: पावसाअभावी राज्यात चिंताजनक स्थिती; शेतकरी- शेतमजुरांच्या हिताचा सरकार विचार करणार : सहकारमंत्री बाबासाहेब पाटील

SCROLL FOR NEXT