अॅग्रोवन वृत्तसेवा
Sugar Factory : वसमत, जि. हिंगोली : वसमत येथील पूर्णा सहकारी साखर कारखाना संचालक मंडळाच्या निवडणुकीत राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना (Purna Cooperative Sugar Factory) महासंघाचे अध्यक्ष तथा माजी सहकार राज्यमंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आमदार चंद्रकांत नवघरे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलला सर्व २१ जागांवर विजय मिळाला.
या निवडणुकीच्या माध्यमातून दांडेगावकर यांनी परत एकदा वर्चस्व सिद्ध केले.
हिंगोली, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांत कार्यक्षेत्र असलेल्या वसमत येथील पूर्णा सहाकरी साखर कारखाना संचालक मंडळाची २०२३-२४ ते २०२८-२९ या कालावधीच्या निवडणुकीत जयप्रकाश दांडेगावकर यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी विकास पॅनेल, माजी सहकार मंत्री शिवसेना (ठाकरे गट) डॉ. जयप्रकाश मुंदडा, भाजपच्या उज्ज्वला तांभाळे, श्रीकांत देशपांडे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास परिवर्तन पॅनेल, काँग्रेसचे अ. हफीज यांच्या नेतृत्वाखाली पूर्णा कारखाना बचाव पॅनेलचे मिळून एकूण ४८ उमेदवार होते.
रविवारी (ता. ९) मतदान घेण्यात आले. मंगळवारी (ता. ११) सकाळी ८ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी विश्वास देशमुख, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार शारदा दळवी, सहायक निबंधक किशोर दुधमल यांच्या उपस्थितीत सुरू झालेली मतमोजणी रात्री उशिरा संपल्यानंतर निकाल जाहीर करण्यात आले.
विजयी उमेदवार
ऊस उत्पादक सभासद मतदार संघ, वसमत गट ः जयप्रकाश दांडेगावकर, आमदार चंद्रकांत नवघरे, शंकर इंगोले.
चुडावा गट ः सुनील कदम, शहाजी देसाई, गजानन धवन. पूर्णा गट ः भगवान धस, श्रीधर पारवे, बबन बेंडे. जवळा बाजार गट ः सुरेश आहेर, चांदू इंगोले, गजानन संवडकर.
आडगाव-साडेगाव गट ः प्रल्हाद काळे, विश्वनाथ फेगडे, बाळासाहेब बारहाते. उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था मतदार संघ ः नितीन जाधव. अनुसूचित जाती जमाती प्रवर्ग ः किशन देशमाने. महिला राखीव प्रवर्ग ः मनीषा चव्हाण, अंजनाबाई झुंजुर्डे.
इतर मागास प्रवर्ग ः ज्ञानोबा वंजे. विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्ग ः हरिभाऊ शेळके.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.