MLA Ambadas Danve Agrowon
ताज्या बातम्या

Ambadas Danve : सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये गैरव्यवहार; अंबादास दानवे यांचा आरोप

Team Agrowon

Mumbai News : राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. कृषी विभागातील अनेक अधिकारी बदलीस पात्र नसतानाही त्यांची पदोन्नतीसह बदली केली आहे. वन, महसूल आणि कृषी विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून त्यात गैरव्यवहार झाल्याचा आरोप, विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मंगळवारी (ता. २०) केला. शासकीय निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत श्री. ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते दानवे म्हणाले, की सरकारने महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश पहाटे चार वाजता काढून अधिकृतरीत्या प्रसिद्ध न करता अधिकाऱ्यांना सोशल मीडियावर ते पाठविले आहेत. राज्यात महसूल विभागात २०० बदल्या झाल्या असून कृषी विभागाच्या सचिवाने अनेकजण बदलीस पात्र नसल्याचा शेरा मारला होता.

तरीही त्या बदल्या करण्यात आल्या आहेत. वन, कृषी, उत्पादन शुल्क विभागात मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्या असून यात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला आहे. सध्या राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ हा उपक्रम राबवीत आहे. मात्र, वास्तवात ‘अधिकारी मंत्र्यांच्या घरी’ असा प्रकार सुरू आहे. वन विभागात झालेल्या बदल्यांबाबत भाजपच्याच चार आमदारांनी तक्रार केली. त्यानंतर बदल्या थांबविण्यात आल्या.

उत्पादन शुल्क विभागात वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे अधिकार सचिवांकडे असतात. तरीही उत्पादन शुल्क मंत्र्यांनी बदल्या केल्या आहेत. सरकारी बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराने थैमान घातले आहे. जो अधिकारी भ्रष्टाचाराला प्रोत्साहन देईल, गैरव्यवहार करेल त्याला हवे त्या ठिकाणी पोस्टिंग मिळते व जे मंत्र्यांच्या मनाविरुद्ध काम करेल त्यांना पद्धतशीरपणे बाजूला केले जात आहे, असेही दानवे म्हणाले.

कचऱ्यात पण प्रकार असतात

मनीषा कायंदे यांच्या पक्षांतराबाबत बोलताना त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. कायंदे यांनी पक्ष सोडल्यानंतर कचरा गेला अशी टीका करण्यात आली होती. त्याला कायंदे यांनी कचऱ्यातूनच वीजनिर्मिती होते, असे प्रत्युत्तर दिले होते. यावर दानवे यांनी ‘कचऱ्यातपण प्रकार असतात. बिनकामाचा कचराही असतोच की, तो बाजूला केला.’ असा टोला दानवे यांनी लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

Sugar Industry : भारत-ब्राझीलमधील साखर उद्योगाचा गोडवा वाढला

Food Industry Development: सरकारकडून अन्न प्रक्रिया क्षेत्रात अनेक सुधारणा

Monsoon 2024 : मॉन्सूनचा परतीचा मुहूर्त लांबतोय

Maharashtra Rain : विजांसह पावसाची शक्यता

SCROLL FOR NEXT